मुंबई

गुडविन ज्वेलर्सचे मालक तुरूंगात

सकाळ वृत्तसेवा


ठाणे : ठाणे जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या गुडविन ज्वेलर्सचे दोघेही मालक बंधूंची चहूबाजूने आर्थिक नाकेबंदी केल्याने दोघेही अखेर ठाणे न्यायालयात शरण आले. सुनीलकुमार अकराकरण आणि व्यवस्थापकीय संचालक सुधीरकुमार अकराकरण यांना पोलिसांनी अटक केली.

 शनिवारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, या भामट्यांविरोधात ठाणे, डोंबिवली, अंबरनाथसह पालघर, वसई, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल असून ठाणे पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सच्या मालक व संचालकाविरोधात यापूर्वी लूकआऊट नोटीसदेखील जारी केली होती.

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर गुडविन ज्वेलर्सच्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचा भंडाफोड झाल्याने खळबळ उडाली होती. केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यात मूळ गाव असलेल्या भामट्या सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोघा बंधूंनी गुडविन ज्वेलर्सच्या ठाणे पोलिस आयुक्तालयातील ठाणे, डोंबिवली, अंबरनाथसह पालघर, वसई, चेंबूर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे शाखा उघडल्या होत्या.

तसेच, वर्षाला १६ ते १८ टक्के व्याज व मासिक एक हजार रुपयेप्रमाणे वर्षाला १२ हजारांसह सोन्याचे दागिने व एक हजार रुपये अशा दोन योजना या भामट्यांनी राबवल्या होत्या. सुमारे एक हजार १५४ गुंतवणूकदारांनी अंदाजे २५ कोटींची गुंतवणूक गुडविनमध्ये केली होती. जून-जुलै २०१९ पर्यंत या योजनांचा परतावा देण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार काहींना मोबदला दिला. त्यानंतर २१ ऑक्‍टोबर रोजी ऐन दिवाळीच्या तोंडावर दुकाने बंद करून कुटुंबासह धूम ठोकली होती. 

याप्रकरणी, गुडविनचे मालक सुनीलकुमार अकराकरण, सुधीरकुमार अकराकरण या दोघा भावांसह सचिव सचिन चौधरी, गुडविनचे व्यवस्थापक वेणुगोपाल, सुब्रमण्यम मेनन आणि प्रदीप यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. 


आरोपींची मालमत्ता जप्त 
सर्व आरोपी फरार झाल्याने ठाणे पोलिसांनी थेट केरळ आणि तामिळनाडू गाठले. मागील दीड महिन्यांपासून ठाणे गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केरळ राज्यातील त्रिशुर येथे जावून शोधमोहीम हाती घेतली. व दोन्ही भावांची स्थावर मालमत्ता जप्त करून नऊ बॅंक खाती गोठविण्यात आली. यामध्ये शोरूम, घर, बंगले, फार्म हाऊस, शेतजमीन, मर्सिडीज, फॉर्च्युनर कारसह पाच मोटारी व दोन दुचाकी, म्युचुअल फंडस्‌, एलआयसी, शेअर्स अशा २० कोटींच्या मालमत्तेचा समावेश आहे. 

२०१९ च्या नव्या कायद्यांतर्गत गुन्हा
गुडविनच्या दोघा बंधूंविरोधात भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ३४, ४०९ सह कलम ३, ४ एमपीआयडी ॲक्‍ट १९९९ सह कलम ३, ४, ५ बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम ॲक्‍ट २०१९ आदी कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये नव्याने जुलै २०१९ मध्ये पारीत करण्यात आलेला बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम ॲक्‍ट २०१९ याचादेखील समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, गुडविन ज्वेलर्समधील गुंतवणुकीमध्ये ज्या गुंतरणूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकर खून प्रकरणी मोठा निकाल ! तिघे निर्दोष...दोघांवर गुन्हा सिद्ध

Narendra Dabholkar Case Live Updates: सूत्रधारांविरोधात वरिष्ठ न्यायालयात जाणार, सरकारी वकिलांची माहिती

Suresh Jain: ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याने लोकसभेच्या धामधुमीत केला जय महाराष्ट्र! काय सांगितलं कारण ?

Axis Bank: धक्कादायक! ॲक्सिस बँकेची 22 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक! कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Watch Video: चक्क जन्मठेपेची शिक्षा झालेले 9 कैदी तुरुंगातून पास झाले बारावीची परीक्षा

SCROLL FOR NEXT