मुंबई

मोफत देणार दररोज ५ GB डेटा; लॉक डाऊनमध्ये ग्राहकांना स्पेशल गिफ्ट

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे बहुतांश लोकं वर्क फ्रॉम होम करतायत. वर्क फ्रॉम करत असताना सगळ्यात जास्त गरज असते ती इंटरनेटची. मात्र लॉकडाऊमध्ये इंटरनेट यूजर्स अचानक वाढल्यामुळे लोकांना स्पीड कमी मिळत आहे. मात्र आता BSNL नं आपल्या ग्राहकांना एक स्पेशल गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLनं गेल्या महिन्यात लॉकडाउनमुळे ब्रॉडबँड युजर्ससाठी आणलेली आपली ‘वर्क फ्रॉम होम’ ही ऑफर १९ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज १० MBPS च्या स्पीडनं  तब्बल ५ GB डेटा मिळत असतो. महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्लॅन पूर्णतः फ्री असणार आहे.

काय आहेत या प्लॅनची वैशिष्ट्यं:

  • हा प्लॅन पूर्णतः मोफत असणार आहे.
  • झीरो कॉस्टवर मिळणाऱ्या या Work@Home प्लॅनसाठी मंथली डिपॉझिट देण्याची गरज नसणार आहे.
  • यासाठी इंस्टॉलेशन चार्ज देण्याचीही गरज नसणार आहे.
  • आधीपासून BSNL ब्रॉडबँडचे जे यूजर्स आहेत त्यांनाच ही ऑफर लागू असणार आहे.
  • १८००-३४५-१५०४ या नंबरवर फोन करून यूजर्स या स्पेशल ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहेत.
  • या प्लॅनमध्ये दररोज १० MBPS च्या स्पीडनं 5 GB डेटा मिळणार आहे.
  • डेटा मर्यादा संपल्यानंतर ही स्पीड १ Mbps वर येणार आहे.
  • विशेष म्हणजे ५ GB डेटाची मर्यादा संपल्यानंतरही कंपनीनं FUP मर्यादा ठेवली नाहीये.
  • व्हॉइस कॉलिंगची कोणतीही नवीन सुविधा या प्लॅनमध्ये नसणार आहे.
  • कॉलिंगसाठी अ‍ॅक्टिव्ह प्लॅनच वापरावा लागणार आहे.  
  • हा प्लॅन फक्त इंटरनेट डेटा बेनिफिटसाठी आहे.
  • BSNL च्या या प्लॅनचा फायदा लँडलाईन ब्रॉडबँड कनेक्शन असलेल्यांनाच मिळू शकणार आहे.

लॉकडाऊनमध्ये लोकांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी इंटरनेटची उत्तम सुविधा प्राप्त व्हावी म्हणून BSNL नं ही स्पेशल ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे.

BSNL to give 5 gb per day data for free read how to apply to avail this offer

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT