मुंबई

हाजी अली दर्ग्याला "बुलंद दरवाजा' उभारणार!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्गाचे नुतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज येथे दिले. हाजी अली दर्गा नुतनीकरण व सौंदर्यीकरणासंदर्भात आज मंत्रालयात श्री. शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी दर्गाच्या नुतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले. 

शेख म्हणाले, हाजी अली दर्गा येथे दररोज देशविदेशातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. हे एक महत्त्वाचे धार्मिक तसेच पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे या परिसराचे नुतनीकरण व सौंदर्यीकरण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या सर्व परवाने तातडीने घेण्यात यावेत. तसेच सौंदर्यीकरणात बाधा येणारे या परिसरातील अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याचीही कार्यवाही तातडीने करावी. 

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सह पोलीस आयुक्त नवल बजाज, मुंबई मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन., हाजी अली दर्गाचे विश्वस्त मसूद हसम दादा, रिझवान मर्चंट, सुहेल खांडवानी, जफर शेख आदी यावेळी उपस्थित होते. 

असे असेल सौंदर्यीकरण. 

  • मुख्य रस्त्यावर भव्यदिव्य बुलंद दरवाजा उभारणार 
  • विविध फुलांची झाडांची मुघल गार्डन 
  • मुघल गार्डनमध्ये प्राचीन काळाची आठवण करून देणारे बाकडे, लाईट यांची व्यवस्था 
  • भाविकांसाठी विशेष सोयीसुविधासाठी "व्हिजिटर प्लाझा' 
  • मुख्य रस्ता ते दर्गा या मार्गाचे नुतनीकरण करून सुंदर रस्ता होणार 
  • दर्गाचे मुख्य दरवाजाचे सौंदर्यीकरण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT