मुंबई

मौजमजेसाठी घरफोडी, २४ तासात अल्पवयीन आरोपीसह दोन जण ताब्यात 

शरद भसाळे

ठाणेः भिवंडी तालुक्यातील कोनगाव प्रेमनगर भागातील एका चाळीत मौजमजा करण्यासाठी घरफोडी केल्याची घटना उघड झाली. आरोपींनी सोन्याचे दागिने पोबारा केले. त्यानंतर अवघ्या २४ तासात दोघा आरोपींसह एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांनी चोरी केलेला दोन लाख 83 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी कोनगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  
भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील गावदेवी मंदिर परिसरातील चाळीत राहणाऱ्या सुचित्रा संजय भोईर यांच्या घरातील लाकडी कपाटातील लॉकर मध्ये कापडी पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने ज्यामध्ये गंठण, बांगड्या, कानातील कर्णफुले ,अंगठी असे सुमारे 61 ग्रॅम वजनाचे दागिने चोरीस गेले होते. या बाबत कोनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर  वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर, सहा पोलिस निरीक्षक अभिजित पाटील यांचा पथकाने सखोल तपास सुरू केला.

मिळालेल्या माहिती वरून पोलिसांनी एक अल्पवयीन मुलासह घरफोडी झालेल्या परिसरातील चाळीत राहणारा जयेश चंद्रकांत पाटील (रा.कोनगाव ) चिंट्या नरेंद्र रायबागी (रा.चिकणघर कल्याण )यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल अवघ्या 24 तासात हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.  न्यायालयाने दोघा आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली तर अल्पवयीन मुलास बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Burglary for fun two arrested in 24 hours thane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

Smartphone Survey: स्क्रीन फुटली,फोन बदलला! ५३% भारतीयांनी खरेदी केला नवीन फोन!

iPhone मध्ये लपलेत 'हे' 5 सिक्रेट फीचर्स, 90% भारतीयांना माहितीच नाहीत

Latest Marathi News Live Update : तुकाराम मुंढेंना पांडुरंगाच्या महापूजेचा मान मिळावा; सत्यशोधक वारकरी महासंघाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

Solapur: गौडगाव (बु) येथे विदयार्थ्यांना वॉटर बॉटल, वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण, १०० वृक्षांचे वृक्षारोपण

SCROLL FOR NEXT