burqa  sakal media
मुंबई

माटुंग्याच्या एमएमपी शाह महिला महाविद्यालयात बुरखा, घुंगट आणि स्काॅर्फवर बंदी

विद्यार्थी संघटना संतप्त; विषमता निर्माण केली जात असल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या काही दिवसांत कर्नाटकनंतर देशभरात हिजाब प्रकरण (Hijab Controversy) गाजत असतानाच माटुंगा येथील एमएमपी शाह महिला महाविद्यालयात (MMP Shah women's college) मुस्लिम आणि इतर मुलींना बुरखा, घुंगट आणि स्कार्फ (burqa, ghoonghat and scarf) घालण्यास सक्त मनाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना या महाविद्यालय प्रशासनाच्या कारभारावर (College authorities) संतप्त झाल्या आहेत. मुलींचे महाविद्यालय असताना अशा प्रकारची नियमावली जारी करून महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

दरम्यान, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी बंदी घालण्यात आली असून आमचा निर्णय कोणत्याही धार्मिक बाबींशी निगडित नाही, असा खुलासा महाविद्यालयातर्फे करण्यात आला आहे.
एसएनडीटी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या मुंबईतील महाविद्यालयांपैकी फक्त एमएमपी शाह महिला महाविद्यालयात अशा प्रकारच्या नियमाची अंमलबजावणी होत आहे. त्यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांना विचारले असता त्यांनी, आपल्याला अशी काही नियमावली असल्याची माहिती नसल्याचे सांगत त्यात दुरुस्ती करण्याच्या तातडीने सूचना दिल्या जातील, असे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

एमएमपी शाह महिला महाविद्यालयाच्या शिष्टाचाराचे पालन करण्यासाठी विद्यार्थिनींनी योग्य कपडे परिधान करून यावेत, असे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे हिजाब, बुरखा, घुंगट किंवा स्कार्फला बंदी घालण्यात आली ती त्यांच्या सुरक्षेसाठी, असा दावा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लता राजे यांनी केला आहे. बंदीचा निर्णय कोणत्याही धार्मिक बाबींशी निगडित नाही. महाविद्यालयात बुरखा परिधान करून येणाऱ्या विद्यार्थिनींवर आम्ही आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. फक्त वर्गात बसल्यावर बुरखा काढण्यास सांगतो, असेही राजे यांनी स्पष्ट केले.

सुधारणा केली नाही तर आंदोलन

एसएनडीटी विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी वेगळ्या प्रकारे ड्रेस कोड आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर तो मागे घेतला. एमएमपी शाह महिला महाविद्यालयात मुस्लिम मुलींसंदर्भात बुरखा बंदीच्या मार्गदर्शक सूचना आपल्या संकेतस्थळावर ठेवणे गंभीर बाब असून त्यात तातडीने सुधारणा केली नाही तर त्याविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाणी यांनी दिला.

काही मुले बुरखा घालून येत असल्याने आम्ही बंदी आणली. अशा विद्यार्थ्यांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे. आमचा निर्णय कोणत्याही धार्मिक बाबींशी निगडित नाही. महाविद्यालयात बुरखा परिधान करून येणाऱ्या विद्यार्थिनींवर आम्ही कोणतीही कारवाई केलेली नाही.

- डॉ. लता राजे, प्राचार्या, एमएमपी शाह महाविद्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रीमंतीचा दिखावा की कलाकृतीचा संदेश? शुद्ध सोन्यापासून घडवलेल्या 'टॉयलेट'ची जगात चर्चा, ट्रम्प यांना देऊ केले होते Toilet; किती किंमत?

Gold Silver Prices Drop: उडवा बार, सोने-चांदीचे उतरले भाव! लग्नसराईपूर्वी खरेदीसाठी सराफा बाजारामध्ये वाढली गर्दी

Mappls उठवणार Google Maps चा बाजार? आता रस्त्यासह एका क्लिकवर मिळणार मेट्रोची A टू Z माहिती..कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Pune Elections : पुणे जिल्हा निवडणूक, ६० हजार हरकतींवर सुनावणी पूर्ण; १४ नगर परिषदांसाठी अंतिम मतदारयादी जाहीर

MPSC Exam : एमपीएससी निकालावर आरक्षण धोरणाचा 'ब्रेक'! १०७ उमेदवारांचा न्यायालयीन लढा; अंतिम निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT