Molestation Sakal
मुंबई

मुंबईला येणाऱ्या विमानात अभिनेत्रीचा लैंगिक छळ, बिझनेसमॅनला अटक

हँडबँग घेण्यासाठी म्हणून जागेवरुन उठली. त्यावेळी कोणीतरी तिच्या कमरेत हात टाकून तिला खेचत असल्याचे जाणवले.

दीनानाथ परब

मुंबई: दिल्ली-मुंबई विमानात (delhi-mumbai flight) अभिनेत्रीचा लैंगिक छळ (actress harrasement) केल्या प्रकरणात एका बिझनेसमॅनला अटक (businessman arrest) करण्यात आली आहे. हा बिझनेसमॅन गाझियाबादचा रहिवाशी आहे. ही घटना घडल्यानंतर अभिनेत्रीने केबिन क्रू (cabin crew) ला सर्तक केलं व लगेच पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. ४० वर्षीय महिला मुंबईत रहायला असून ती १ ऑक्टोबरला दिल्लीला गेली होती. ३ ऑक्टोबरला ती फ्लाईटने मुंबईला येत होती. त्यावेळी ही घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

विमानाने सकाळी ११ च्या सुमारास मुंबई विमानतळावर लँडिंग केल्यानंतर अभिनेत्री सामान ठेवण्याच्या कप्प्यामधून हँडबँग घेण्यासाठी म्हणून जागेवरुन उठली. त्यावेळी कोणीतरी तिच्या कमरेत हात टाकून तिला खेचत असल्याचे जाणवले. तिच्या मागे एक पुरुष होता. महिलेने तिच्या तक्रारीत हा उल्लेख केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर ती संतप्त झाली. महिलेने केबिन क्रू कडे तक्रार केल्यानंतर त्यांनी महिलेला कस्टमर केअरला मेल पाठवायला सांगितला.

केबिन क्रू ने त्या पुरुष प्रवाशाला बाजूला केलं. त्याचं नाव आणि सीट नंबर विचारला. त्याच संध्याकाळी महिलेने एअर लाइनला मेल केला. महिला वर्सोवा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिला सहार पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलं. कारण गुन्हा त्यांच्या हद्दीत घडला होता. महिलेने एफआयआर नोंदवल्यानंतर सहार पोलिसांनी एअर लाइन्सशी संपर्क साधून संबंधित प्रवाशाचे डिटेल्स घेतले.

आरोपी सहार पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याला १४ ऑक्टोबरला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT