Corona  sakal
मुंबई

‘सी.१.२’ पासून सावध राहा!

कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत टास्क फोर्सचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता असताना अल्फा, डेल्टा आणि डेल्टा प्लस असे नवीन प्रकार समोर येत आहेत. त्यापाठोपाठ आता कोरोना विषाणुचा ‘सी.१.२’ प्रकार आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या विषाणुची तीव्रता अधिक असून तो झपाट्याने पसरत आहे. सध्या भारतात या विषाणूचा एकही रुग्ण नसला, तरीही सतर्क राहण्याचा सल्ला राज्य कोविड टास्क फोर्सने दिला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबनल डिसिजेस (एनआयसीडी) आणि दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू-नॅटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेंसिंग प्लॅटफॉर्म (केआरआयएसपी) च्या शास्त्रज्ञांनी नुकताच एक अभ्यास केला. त्यांना मे महिन्यात पहिल्यांदा कोरोना विषाणूचा ‘सी.१.२’ हा नवा प्रकार दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. तेव्हापासून तो वेगाने इतर देशांमध्येही पसरला. सध्या चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझिलंड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडमधील कोरोना रुग्णांमध्ये हा प्रकार आढळला आहे.

राज्यात रुग्ण नाही

मुंबईसह महाराष्ट्रात आतापर्यंत डेल्टा आणि डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात ‘सी.१.२’ विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून तो राज्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषाणूची तीव्रता ही इतर प्रकाराच्या तुलनेत अधिक असल्याने आपण सतर्क राहिले पाहिजे, असे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

"सध्या हा प्रकार दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. त्याचा मुंबईसह महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या प्रकारापैकी हा सर्वाधिक घातक आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी."

- डॉ. गौतम भन्साळी, सदस्य, कोविड टास्क फोर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT