File Photo 
मुंबई

सीएएविरोधातील नागपाड्यातील आंदोलन अखेर मागे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिल्लीच्या शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईतील नागपाडा परिसरात महिलांनी सुरू केलेले सीएए, एनआरसी, एसपीआर विरोधात सुरू असलेले आंदोलन सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. सुरक्षेच्या कारणावरून हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र काही महिलांनी मागे हटणार नसल्याचे सांगत आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मदनपुरा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल भागातील महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सीएए आणि एनआरसी रद्द करावे, या मागणीसाठी रविवार रात्रीपासून या महिला ठिय्या आंदोलन करीत आहेत. या महिलांना पाठिंबा देण्यासाठी पुरुषही रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील शाहीनबाग परिसरात सीएए आणि एनआरसीविरोधात महिला आंदोलन करीत आहेत.

त्यापासून प्रेरणा घेत, शाहीनबागच्या धर्तीवर महिलांनी सीएए आणि एनआरसीविरोधात मुंबईतील नागपाडा परिसरात आंदोलन सुरू केले. आंदोलनाची तीव्रता पाहून कडेकोट बंदोबस्त या परिसरात ठेवला होता. मुंबई बाग प्रोटेस्टमध्ये स्थानिक आयोजकांनी सुरक्षेच्या कारणास्तव हे आंदोलन मागे घेणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT