Nana Patole Sakal
मुंबई

Cabinet Meeting: सध्याचं सरकार केवळ घोषणा करणारं अन् महाराष्ट्राला अधोगतीकडं नेणारं; पटोलेंची टीका

छत्रपती संभाजीनगर इथं आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील सध्याचं सरकार हे केवळ घोषणा करणारं सरकार असून ते महाराष्ट्राला अधोगतीकडं नेणारं सरकार आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे, यापार्श्वभूमीवर काँग्रेसनं सरकारवर निशाणा साधला आहे. (Cabinet Meeting at Sambhaji Nagar Maharashtra Congress leader Nana Patole criticizes)

फडणवीसांनी केलेल्या घोषणेचं काय झालं?

पटोले म्हणाले, या सरकारकडून अपेक्षा करू नये अशा पद्धतीचं चित्र आज निर्माण झालं आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना मराठवाड्याच्या विकासासाठी 42 हजार कोटींची घोषणा केली होती, याचं पुढे काय झालं याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे. तसेच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठक घेण्याऱ्या सरकारचा निषेध करतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

मविआच्या काळात कामं झाली

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत उद्योगधंद्यांमध्ये 35 टक्के वाढ झाली, 42 टक्के रोजगार निर्मिती झाली, असा दावाही यावेळी पटोले यांनी केला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यांनी विकासाच्या दृष्टीनं जी पाऊलं उचलली त्यामुळं महाराष्ट्र विकासाकडं गेला. (Marathi Tajya Batmya)

सरकार केवळ घोषणा करणारं

सध्याच्या महायुती सरकारच्या काळात उद्योगधंदे गुजरातला गेले, महाराष्ट्राचा औद्योगिक विकास कमी झाला. त्यामुळं हे सरकार केवळ घोषणा करणारं सरकार आणि अधोगतीकडं नेणारं सरकार आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT