tomato farm
tomato farm 
मुंबई

...साहेब, माझं शेत करपलं! गावी जाण्यासाठी शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

सकाळवृत्तसेवा

मिरा रोड : लॉकडाऊनमुळे दुसऱ्या गावात अडकून पडल्याने तीन एकर शेतातील पीक अक्षरशः करपून गेले आहे. त्यामुळे  एका शेतकऱ्याने आता तरी मला गावी जाण्याची परवानगी मिळावी अशा आर्त हाकेचे पत्र मेलव्दारे थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले आहे.  

भाईंदर येथील राई गावात राहणारे बाबूराव वाघ हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालूक्याच्या बभळाज गावातील शेतकरी आहेत. लॉकडाऊनपूर्वी आपल्या तीन एकर शेतात टोमॅटोची लागवड करुन ते राई येथील घरी कामानिमित्त आले होते. यानंतर टोमॅटोचे हाती आलेले पीक घेण्यासाठी ते गावी जाण्यास निघाले असतानाच देशभर लॉकडाऊन लागू झाला. तेव्हापासून ते राई येथील घरात गावी जाण्याची प्रतिक्षा करीत आहे. 

दरम्यान टोमॅटोचे पीक वाया गेल्याने आपल्याला गावी जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आर्त हाक घातली आहे. साहेब, माझं पीक करपलं! असे सांगत त्यांनी याबाबत मेलद्वारे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. बभळाज येथील टोमॅटोला राज्यासह गुजरात, मध्यप्रदेशात मोठी मागणी आहे. लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी आदेश लागू करण्यात आल्याने वाघ आपल्या राई येथील घरीच अडकून पडले. 

तोंडी आलेला घास गेला
लॉकडाऊनमुळे टोमॅटोचे पीक आडवे होऊन शेत लाल झाले. तोंडी आलेला घास निघून गेल्याने बाबूराव यांनी टोमॅटोच्या लागवडीसाठी केलेला सुमारे 1 लाखाचा खर्च देखील त्यांच्या पदरी पडला नाही. दरम्यान वाया गेलेल्या पीकाचे नुकसान भरुन काढण्यासाठी तसेच अन्य पीकांची लागवड करायची असल्याने आता तरी आपल्याला गावी जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना इमेल व्दारे पत्र लिहले आहे.

Call the farmer's chief minister to go back to the village for farming

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT