Kishori Pednekar Esakal
मुंबई

Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल; BEST कर्मचाऱ्यांच्या PFवर मारला डल्ला?

ऑक्टोबर 2021 मध्ये 127 कर्मचार्‍यांचा पीएफ त्यांच्या खात्यात जमा झाला नाही

सकाळ डिजिटल टीम

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात लोअर परळ येथील एनएम जोशी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे.

याआधी वरळीमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लाभार्थी नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका बळकावल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर झाला होता. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्यावरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जवळजवळ 264 बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (PF) रोखल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वांद्रे येथील रहिवासी 45 वर्षीय विद्या संदीप बाबर नावाच्या तक्रारदाराने प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला होता.

किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी किशोरी पेडणेकर यांच्या मालकीची आहे. अनेक कर्मचाऱ्यांचा पीएफ कापला गेला पण त्यांच्या पीएफ खात्यात तो जोडला गेला नाही, असा आरोप बाबर यांनी आपल्या तक्रारीमधून केला आहे.

किश कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे प्रशांत महेश गवस, शैला प्रशांत गवस आणि गिरीश रमेश रेवणकर अशा तीन कर्मचाऱ्यांवर पीएफ खात्यात न जमा केल्याचा आरोप आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकूण 4,47,84 इतकी रक्कम कापली गेली मात्र ती पीएफ खात्यात जमा केला नाही.

ऑक्टोबर 2021 मध्ये 127 कर्मचार्‍यांचा पीएफ त्यांच्या खात्यात भरला नाही, तर नोव्हेंबर 2021 मध्ये 137 कर्मचार्‍यांना पैसे दिले नाहीत. आता या विरुद्ध नोंदवलेल्या प्रकरणात, भारतीय दंड संहितेच्या 406 (गुन्हेगारीचा भंग), 34 यासह इतर कलमे जोडण्यात आली आहेत.

वरळीमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लाभार्थी नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका बळकावल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर याआधी करण्यात आला होता. या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळाला आहे. पेडणेकर यांच्या याचिकेवर 30 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात याचिकादाराविरोधात तूर्त आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT