तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात गुन्हा 
मुंबई

तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा 2019 कलम 4 व 498 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. मालवणीतील रहिवासी आफ्रिन नाज सिद्दीकी यांनी पती मसूद सिद्दिकी यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. 

तक्रारीनुसार, आफ्रिन नाज सिद्दिकी यांचा मसूद सिद्दिकीशी 2017 मध्ये विवाह झाला. त्यावेळी मसूद सिद्दीकी रिक्षा चालवत; मात्र अधिक कमाईसाठी तो जून 2019 मध्ये सौदी अरेबियाला गेला. तेथे तो शिलाई काम करत असे. त्यापूर्वी आफ्रिन यांना मूलही झाले होते. तरीही मसूदकडून कोणतेही पैसे आफ्रिनला येत नसत. लग्नानंतर काही दिवसांनी त्याने क्षुल्लक कारणावरून आफ्रिनला मारहाण केली होती. तसेच सौदी अरेबियाला जाण्यासाठी त्याने आफ्रिनवर दबाव टाकून सासरकडून पन्नास हजार रुपयेही घेतले होते.

सौदी अरेबियाला गेल्यावर त्याने आफ्रिनशी जवळपास संपर्क तोडला होता. तो फोनवरही बोलत नसे. यादरम्यान, अचानक गेल्या 4 फेब्रुवारी रोजी तो घरी आला व आपल्या आईकडे घराच्या हिश्‍शाची मागणी केली. आफ्रिनने विरोध केल्यावर त्याने आफ्रिनची आई, स्वत:ची आई नुसरत परवीन व इतर नातेवाईकांसमक्ष मी तुला तलाक देतो म्हणत तिहेरी तलाक दिला. त्याविरोधात मंगळवारी (ता. 4) आफ्रिनने तक्रार दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT