persian cat 
मुंबई

वाघाच्या मावशीचे घराघरांत लाड! कुत्र्यांपेक्षा खर्च कमी असल्याने मांजर पाळण्यास प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा

- वैभवी शिंदे

कुत्रा एकनिष्ठ असतो, पण वाघोबाची मावशी अर्थात मांजरदेखील घराघरांमध्ये दिसते. भारतीय चालीरीती, परंपरांनुसार मांजर घरातील एक घटक असल्याप्रमाणेच वावरते. अशातच आता परदेशातील मांजरीदेखील पाळल्या जात असून कुत्र्यांपेक्षा कमी खर्च असल्याने अनेक लोक मांजरी पाळत आहेत.

इराणमधील प्रजाती असलेल्या पर्शियन, तुर्कस्तानातील मूळ प्रजाती असलेली तुर्कीश अंगोरा, एक्झॉटिक शॉर्ट हेअर, माईन कून, रॅग डॉल या अमेरिकन प्रजाती, सयामी ही थायलंडमधील प्रजाती पाळण्याकडे सध्या प्राणीप्रेमींचा कल आहे. बहुतेक घरांत ‘बेंगाल’ या प्रजातीची मांजरे असतात. ही मांजरे बहुतेकदा आपल्या कबऱ्या, ठिपकेवाल्या देशी मांजरांशी साधर्म्य असलेली असतात. त्याचप्रमाणे पूर्ण काळी कुळकुळीत आणि हिरवे डोळे असलेली ‘बॉम्बे’ या प्रजातीशी साधर्म्य असलेली मांजरेही दिसतात; मात्र बेंगाल किंवा बॉम्बे अशी नावे असली तरी अमेरिकन प्रजाती म्हणून नोंद आहे.

शॉर्ट नेपियर पर्शियन

देशी मांजर हे ठिपकेदार, जड, काटे मोडलेले प्राणी असून गोल डोके असलेले, जाड व चिकट केस एक रुंदसारखे दिसले आहेत. ज्यात मोठ्या आकाराचे डोळे आणि एक छोटेसे नाक आहे. त्यात अनेकदा आळशी स्वभावामुळे त्यांना ‘पर्शियन’ असे म्हटले जाते.

रॅगडॉल

ही मांजरीची एक जात आहे. ज्याचा कलर पॉइंट कोट आणि निळे डोळे आहेत. त्याचे आकारविज्ञान मोठे आणि वजनदार आहे. त्याला अर्ध-लांब आणि रेशमी मऊ विनम्र, शांत स्वभाव.

बंगालची मांजर

या मांजरीचे जंगली स्वरूप आहे; त्यांची सोनेरी चमक त्यांच्या बिबट्या मांजरीच्या वंशातून येते. त्यांच्या अंगरख्यावर ठिपके, रोझेट्स, बाणाच्या खुणा दिसतात.

हिमालयीन मांजर

हिमालयीन मांजरीचे डोळे निळे असतात, रंगबिंदू किंवा रंगबिंदू कानांवर तसेच पाय, पाठ आणि शेपटीवर स्थित असू शकतो. उर्वरित फर सामान्यतः पांढरा किंवा मलई असतो. सर्वांत वारंवार रंगाचे बिंदू आहेत. चॉकलेट, लिलाक, क्रीम, लाल, कासव शेल (किंवा टॉर्टीशेल) काळा, निळा असतो. या मांजरीलादेखील बाजारात मागणी आहे.

हायब्रिड

नैसर्गिक किंवा मूळ प्रजातींबरोबरच ‘हायब्रिड आणि मिक्स ब्रिड प्रजातींचाही समावेश आहे. हायब्रिड म्हणजे दोन नोंद झालेल्या प्रजातींची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांचे मुद्दाम ब्रिडिंग करून तयार करण्यात आलेली प्रजाती. दोन प्रजातींचे मुद्दाम न ठरवता ब्रिडिंग झाल्यानंतर त्यातून जन्माला आलेल्या पिल्लात काही पूर्णपणे वैशिष्ट्ये दिसली तर त्याची नोंद मिक्स ब्रिड म्हणून केली जाते.

परवडणाऱ्या किमती

कुत्र्यांपेक्षा मांजरी या प्रेमळ असतात. तसेच परवडणाऱ्या किमतीमध्ये मांजरी उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या आजारपणासाठी दवाखाने, खाण्यासाठी दुकाने उपलब्ध असल्यामुळे मांजर खरेदीकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे विंरगुळ्याचे साधन म्हणून अनेक घरांमध्ये मांजर पाळ्याचे फॅड वाढलेले आहे. तर लोकांची आवड पाहता त्यांची विक्री होत आहे.

"बाजारात अनेक प्रकारच्या मांजरी उपलब्ध आहेत. पाच हजारांपासून ते अठरा हजारांपर्यंत मांजरींना मागणी आहे."

- प्रीत जोसेफ, मांजर विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT