File Photo
File Photo 
मुंबई

यामुळे दहिसरमध्‍ये पसरली घबराट

सकाळ वृत्तसेवा

दहिसर : दहिसर परिसरात कोरोना विषाणूने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली असून केतकीपाडा, आंबावाडी या झोपडपट्टीनंतर आता आयसी कॉलनी या उच्चभ्रू वस्तीतही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.

केतकीपाडा येथील शांतीनगर, पडवळ चाळीत राहणाऱ्या एका २४ वर्षीय महिलेला बुधवारी कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. या महिलेला कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिचा पती आणि सासूलादेखील तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहिसर (प.) प्रभाग क्रमांक ८ मधील आयसी कॉलनी मेरीलॅण्ड कॉम्प्लेक्‍समधील ४२ वर्षीय व्यक्तीस गुरुवारी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही व्यक्‍ती बोटीवर रिगचे काम करते. १९ मार्चला ती यूएईहून भारतात आली होती.  विमानतळावरच त्याच्या हातावर शिक्का मारत त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी घरातील सर्वांना आईकडे राहायला पाठवत स्वतः एकटेच राहिले. तसेच त्यांच्या जेवणाचा डबा आईकडून दररोज येत होता; मात्र त्यांच्या जेवणाचा डबा घराबाहेरच ठेवून इतरांनी त्यांच्याशी संपर्क येऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली.

This caused panic in Dahisar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT