Don Chota rajan
Don Chota rajan 
मुंबई

अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजन विरोधात ७१ पैकी ४६ प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल

सुनिता महामुनकर

मुंबई : गॅंगस्टर छोटा राजनच्या (Chota Rajan) विरोधात सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या 71 प्रकरणांपैकी सुमारे 46 प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट (Closer Report) दाखल केला आहे. तर दुहेरी हत्याकांडचे (Murder) दोन खटले अंतिम टप्प्यात आहेत. ( CBI Closer report of Gangster chota Rajan cases -nss91)

राजनला बालीमधून नोव्हेंबर 2015 मध्ये भारतात आणले होते. त्याच्या विरोधात राज्यात तब्बल एकाहत्तर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा विविध गुन्ह्याचा समावेश आहे. या सर्व फौजदारी फिर्यादी सीबीआयकडे वर्ग करण्याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली होती. याबाबत महाराष्ट्र सरकारनेदेखील त्यावेळी सहमती दिली होती. मुंबई पोलिसांनी एकूण 71 गुन्हे राजनच्या विरोधात दाखल केली आहे. यापैकी 46 प्रकरणात ज्यामध्ये साक्षीदार शोधणे, आणि पुरावे गोळा करणे अशी प्रकरणे क्लोजर रिपोर्टद्वारे बंद केली आहेत. त्यासाठी विशेष न्यायालयात आणि दंंडाधिकारी न्यायालयात अहवाल सादर केला आहे.

एकाहत्तरपैकी अनेक जुने गुन्हे आहेत जे सन 1983 पासून आहेत. यामध्ये आता साक्षीदार हयात नाही. तसूच अनेक साक्षीदार जागा सोडून गेले आहेत किंवा पोलिसांना अन्य पुरावे दाखल करणे शक्य नाही. त्याशिवाय यामध्ये आवश्यक असलेला कॉल डाटा मिळणेही शक्य नाही, त्यामुळे अशी प्रकरणे बंद केली आहे, असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. यामध्ये खंडणीचे गुन्हे अधिक आहेत, असे ते म्हणाले. याचबरोबर अनेक प्रकरणात मूळ तक्रारदाराचा म्रुत्यु झाला आहे किंवा त्याचा पत्ता बदलला आहे. त्यामुळे देखील काही प्रकरणे बंद केली आहेत, असे त्यांनी सांगितले. गॅंगवार, खंडणी न दिल्यामुळे धमकी, हत्या अशी प्रकरणे आहेत.

सध्या राजनविरोधात अभियोग पक्षाने चार-पाच खटल्यांमध्ये दोषीत्व सिध्द केले आहे. दुहेरी हत्याकांडाच्या तीन खटल्यांचे काम सध्या सुरू असून दोन खटले अंतिम टप्प्यात आहेत. यात जे जे, पाकमोडिया स्ट्रीट आणि नागपाडामधील गुन्हे आहेत. याशिवाय परदेशातून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणल्याचा खटलादेखील आहे, असे त्यांनी सांगितले. राजनने त्याच्यावरील सर्व प्रकरणांची सुनावणी एकाच न्यायालयात करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. यावर अद्याप उच्च न्यायालयातील सुनावणी प्रलंबित असून नियमित न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT