मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांप्रकरणी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि परम बीर सिंग यांची सोमवारी चौकशी केली आहे.मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात संजय पांडेना चौकशीसाठी तपास यंत्रणेनी बोलावले होते. ३० जून रोजी निवृत्त झालेल्या पांडे यांना काही दिवसांपूर्वी दोन सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्याबद्दल चौकशीचा सामना करावा लागत आहे.
आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एनएसई कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे रोखणे आणि एनएसई चे सिस्टम ऑडिट करताना सेबी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणे या आरोपांच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता.या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे याला न्यायालयाने सदर खटल्यात माफीचा साक्षीदार बनण्याची परवानगी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.