Niranjan Davkhare
Niranjan Davkhare google
मुंबई

"विरोधकांना नष्ट करून लोकशाही उद्‍ध्वस्त करण्याऱ्यांची CBI चौकशी व्हावी"

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये (fake FIR) अडकविण्याचे महाविकास आघाडीचे (mva government) षडयंत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उघडकीस आणले आहे. विरोधकांना नष्ट करून लोकशाही उद्‍ध्वस्त करण्याच्या या प्रकाराची सीबीआय (CBI) चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे (Niranjan davkhare) यांनी बुधवारी केली.

भाजपचा लोकशाही पद्धतीने मुकाबला करता येत नाही, म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारी वकिलामार्फत पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग करून देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख यांना गुन्ह्यांमध्ये अडकविण्यासाठी कारस्थान रचले. फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुराव्यांमध्ये सरकारी वकिलाने मंत्र्यांच्या गैरव्यवहारांचीही कबुली दिली. राज्य सरकारच्या यंत्रणेचा विरोधकांना संपविण्यासाठी दुरुपयोग करण्यात येत आहे. या प्रकारात पोलिस गुंतले असल्याने याची चौकशी सीबीआयकडूनच करण्यात यावी, असे आमदार डावखरे म्हणाले.

लोकशाही उद्‍ध्वस्त करण्याचा प्रयत्न

विरोधी नेत्यांना गुन्हेगार ठरविण्यासाठी कारस्थाने करणे, तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे, दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्याला पाठिंबा देणे, सरकारविरोधात बोलणाऱ्या नागरिकांवर हल्ले करणे आणि त्यांना पोलिस केसमध्ये अडकवणे, असे प्रकार चालू आहेत. राज्यात लोकशाही संकटात असून अराजक निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT