cbi raid at gst office home Mumbai pune black money seized bribery corruption Sakal
मुंबई

CBI Raid : मुंबई पुण्यात जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर सीबीआयचे छापे

कारवाईवेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांसह मोठा ऐवजही जप्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई आणि पुण्यातील वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर सीबीआयकडून गुरूवारी छापेमारी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यासह मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईवेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांसह मोठा ऐवजही जप्त केला आहे. त्यामुळं आता ऐन पोटनिवडणुकांच्या तोंडावर तपास यंत्रणांकडून छापेमारी करण्यात आल्यामुळं पुण्यात खळबळ उडाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यासह मुंबईतील जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर गुरूवारी दुपारपासून सीबीआयकडून छापेमारी सुरू करण्यात आली. जीएसटी विभागातील एक प्रकरण बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितल्याची तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयनं संशयित अधिकाऱ्यांच्या घरावर छापे मारले आहेत.

मुंबई आणि पुण्यातील अनेक ठिकाणी केलेल्या कारवाईत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चार लाख रुपयांची रोकड, सोनं आणि संशयित कागदपत्रं जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीआयनं आर्थिक गैरव्यवराप्रकरणी देशातील प्रमुख महानगरांमध्ये छापेमारी करत अनेक आरोपींना अटक केली होती.

त्यानंतर आता मुंबई आणि पुणे शहरातील जीएसटी अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणांकडून आरोपी अधिकाऱ्यांकडून संशयास्पद कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

BMC Election Voting: १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या दिवशी रजा नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावरील हल्ला हा राजकीय कट; अवैध धंदेवाल्यांवर आरोप

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

Aluminum Foil किंवा Container मध्ये अन्न ठेवता? जीवावर बेतेल; तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

SCROLL FOR NEXT