sheena bora  sakal
मुंबई

शीना बोरा हत्या प्रकरणात सीबीयचा न्यायालयात क्लोजर रिपोर्ट

शीना बोरा हत्या प्रकरणात पुढील तपास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मागील सहा वर्षांपासून सुरू असलेल्या शीना बोरा हत्या खटल्यात मंगळवारी सीबीआयने विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. आता या प्रकरणातील पुढील तपास थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे सीबीआयने न्यायालयात स्पष्ट केले आहे.

सीबीआयने मंगळवारी न्यायालयात अर्ज केला असून पुढील तपास थांबविण्यासाठी क्लोजर रिपोर्ट दाखल करीत आहे, असे यामध्ये म्हटले आहे. सन 2015 मध्ये अत्यंत नाट्यमय पध्दतीने शीना बोरा हत्याकांड उघड झाले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हीची शीना ही मुलगी होती.

मालमत्तेच्या वादातून इंद्राणीने एप्रिल 2012 मध्ये माजी नवरा संजीव खन्नाच्या आणि वाहन चालक शामवर रायच्या मदतीने हत्या केली आणि तिचा म्रुतदेह पेणजवळील दरीत फेकून दिला असा गुन्हा सीबीआयने नोंदविला आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर तीन वर्षानंतर, हा गुन्हा मुंबई पोलिसांनी उघड केला. रायला अन्य एका प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. त्याची चौकशी करत असताना शीना बोरा हत्याकांड उघड झाले. त्यानंतर इंद्राणी आणि खन्नाला पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणाचा तपास सीबीआयने घेतल्यावर इंद्राणीचा तिसरा नवरा आणि उद्योगपती पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली होती. सीबीआय तक्रारीनुसार, शीना (25) ही इंद्राणीची बहिण आहे असे प्रारंभी सांगितले जात होते मात्र ती आणि तिचा गुवाहाटीमध्ये राहणारा भाऊ मिखाईल हे दोघे इंद्राणीची पहिल्या लग्नातून झालेली मुले होती आणि ते इंद्राणीने दडवून ठेवले.

मुंबईमध्येदेखील शीनाने बहिण म्हणून राहावे, असे इंद्राणीची अट होती. मात्र यावरून शीना तिला ब्लॅक मेल करत होती, त्यातून तिची हत्या करण्यात आली असा सीबीआयचा आरोप आहे. शीना बरोबर मिखाईलला मारण्याचा कट तिनं आखला होता, असेही सीबीआयने म्हटले आहे.

सन 2017 मध्ये या खटल्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत अभियोग पक्षाने सुमारे सत्तर साक्षीदारांचा जबाब नोंदविला आहे. मात्र आता सीबीआयने क्लोजर अहवाल दाखल केल्यामुळे इंद्राणीसह सर्व आरोपींना जामीन मंजूर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पीटर मुखर्जी यापूर्वीच जामिनावर आहे. कारागृहात असतानाच इंद्राणी आणि पीटरने आपल्या सतरा वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम देऊन घटस्फोट घेतला आहे.

सीबीआयने या प्रकरणात तीन आरोपपत्र आणि दोन पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. रायला या खटल्यात माफिचा साक्षीदार करण्यात आले होते. पीटरचा मुलगा राहुल आणि शीनामध्ये असलेल्या प्रेमसंबंधामुळेही इंद्राणी नाराज होती, असे सीबीआयने म्हटले आहे. सन 2012 पासून इंद्राणीने सर्वांना सांगितले होते कि शीना अमेरिकेत गेली आहे. पण रायच्या अटकेमुळे ही हत्या उघड झाली. प्रति सदनिका एक हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT