सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर 
मुंबई

सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लॉकडाऊनमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता 1 ते 15 जुलै दरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश निशांक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

सीबीएसई मंडळाच्या बारावीच्या बिझनेस स्टडीज, भूगोल, हिंदी इलेक्‍टिव, हिंदी कोर, होम सायन्स, सोशलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स (न्यू), इन्फॉर्मेशन प्रॅक्‍टिस, इन्फॉर्मेशन प्रॅक्‍टिस (न्यू), आयटी आणि बायोटेक्‍नोलॉजी या विषयांच्या परीक्षा अद्याप बाकी आहेत. 1 ते 15 जुलैदरम्यान आता या परीक्षा होतील; तर दहावीच्या परीक्षा केवळ पूर्व दिल्लीतील शाळांमध्ये होतील. यामध्ये हिंदी कोर्स ए, हिंदी कोर्स बी, इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिश अँड लिटरेचर, सायन्स आणि सोशल सायन्स या विषयांच्या परीक्षा होतील. 

देशातील इतर भागांत दहावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा होणार नाहीत. मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या 29 विषयांच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत. या परीक्षांबाबत 3 मे नंतर आढावा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे यापूर्वीच बोर्डाने जाहीर केले होते. त्यानुसार आता परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक मंडळ लवकरच जाहीर करणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

SCROLL FOR NEXT