मुंबई

Dombivali News : रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण पण एमआयडीसीला भूर्दंड; रस्त्यालगतच्या गटारांमध्ये मातीचे भराव

डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्याचे एमएमआरडीएच्या माध्यमातून सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम केले जात आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्याचे एमएमआरडीएच्या माध्यमातून सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम केले जात आहे. ही कामे सुरु असताना रस्त्यालगतच्या अनेक चेंबरचे नुकसान झाले असून त्यात डेब्रीज पडले आहे. यामुळे चेंबर तुंबण्याची समस्या उद्भवत आहे. चार ते फूट खोल असलेला डेब्रीजचा ढिगारा एमआयडीसीला काढवा लागणार आहे. तसेच चेंबरच्या काठापर्यंत पेव्हरब्लॉक टाकण्यात आले आहे.

चेंबरचे काम करताना हे पेव्हर ब्लॉक एमआयडीसीला काढावे लागणार आहे. यामुळे या कामांकडे गांर्भियाने लक्ष द्यावे असे पत्र एमआयडीसीने एमएमआरडीएला दिले आहे. रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करताना चेंबरला बसलेला हा फटका म्हणजे एमआयडीसीला भूर्दंडच बसला आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील औद्योगिक, निवासी विभागात एमएमआरडीएच्या माध्यमातून 110 कोटींची रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. कही रस्त्यांची कामे झाली आहेत, तर काही रस्त्यांची कामे सुरु आहेत. सध्याच्या घडीला एमआयडीसीने काँक्रीट रस्त्यालगतची भूमिगत खराब झालेल्या जुन्या मलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले आहे.

दरम्यान एमआयडीसीच्या असे लक्षात आले आहे की रस्त्याचे काम करताना अनेक चेंबरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांनी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अर्जुन कोरगावकर यांना एक पत्र पाठविले आहे.

त्यामध्ये त्यांनी संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या एजन्सीला एमआयडीसीच्या भूमिगत ड्रेनेज लाइन्स आणि त्यावरील चेंबर्सची काळजी घेण्यासाठी योग्य सूचना द्याव्यात अशी विनंती केली आहे. तसेच काँक्रीट रस्त्यांच्या खोदकामात अनेक चेंबरचे नुकसान झाले आहे, चेंबरमध्ये डेब्रिज पडले आहे ज्यामुळे लाईनवर वारंवार चोकअपची समस्या निर्माण झाली आहे आणि 4 ते 5 फूट खोल चेंबर्सचा ढिगारा काढणे कठीण आहे. हा प्रश्न गंभीर आहे.

एमआयडीसीची कामे सुरू होण्यापूर्वीच ‘एमएमआरडीए’ने रस्ता सीमारेषा आणि चेंबर लाईन यामधील मोकळी जागा म्हणजेच चेंबरच्या काठापर्यंत पेव्हर ब्लॉक लावून बंद केल्या आहेत. भुयारी अंतर्गत कामे करण्यापूर्वीच पेव्हर ब्लॉक लावले तर मोठी समस्या निर्माण होईल. पेव्हर ब्लॉक काढून भुयारी मलवाहिन्या दुरुस्तीची कामे करावी लागणार आहेत.

त्यामुळे केलेले काम फुकट जाईल, असे एमआयडीसी प्रशासनाने एमएमआरडीएला कळविले आहे. पेव्हर ब्लाॅक बसविण्याचा निर्णय कायम असेल तर गटार, भुयारी मलवाहिन्यांच्या भागात, काँक्रीट रस्त्याच्या सीमारेषेपासून काही अंतर पेव्हर ब्लॉक बसू नयेत, अशी सूचना एमआयडीसीने ‘एमएमआरडीए’ प्रशासनाला केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT