corona vaccine
corona vaccine sakal media
मुंबई

दानशुर कंपन्यांकडून मुंबई महापालिकेला साडे चार लाख लसींचे डोस

भाग्यश्री भुवड

मुंबई : केंद्राकडून (central government) पुरेसा लस साठा उपलब्ध (less vaccines) होत नसल्यामुळे पालिकेला (BMC) लसीच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे, परंतु काही कंपन्यांनी (company vaccine donation) उदारता दाखवत पालिका आणि मुंबईकरांना लसीचे दान केले आहे.  देणगी म्हणून पालिकेला सुमारे साडे चार लाख डोस मिळाले आहेत.

पालिका आणि मुंबईकर दोघेही लसीच्या अभावामुळे चिंतेत आहेत. लस उपलब्ध न झाल्यामुळे, केंद्रांवर दररोज गर्दी होते. आपला नंबर पहिला यावा म्हणून भांडणे होतात. त्यातच जर लसीचे डोस संपलेच तर लस न घेताच निराश होऊन परतावे लागते. या सर्व समस्यांमध्ये, काही कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत पालिकेला लस दान करून मदतीचा हात पुढे केला आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, काही कंपन्यांनी सीएसआरद्वारे पालिकेला लस दान केली आहे, तर काहींनी लस देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या गोदरेज कंपनी, रिलायन्स आणि सीटी बँकेने लस दान केली आहे. येत्या काही दिवसांत सिप्ला 50 हजार डोस देणार आहे. कोरकडून 10 हजार डोस दिले जाणार आहेत.

या व्यतिरिक्त, जसलोक रुग्णालयासह अनेक कंपन्या आहेत ज्यांनी लस दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा एक चांगला उपक्रम आहे, लोकांना लसीकरण देखील केले जाईल आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी देखील मदत होईल.

पालिका देणार केंद्र

सुरेश काकाणी यांनी सांगितले की, लस देणाऱ्या खाजगी कंपन्यांना लसीकरणासाठी आपले केंद्र आणि कर्मचारी पुरवले जातील. अनेक कंपन्यांनी लसीकरण देखील सुरू केले आहे. सिटीबँकेला धारावीतील महापालिका शाळा, रिलायन्सला वरळी आणि सायनमधील प्रतीक्षा नगर येथील एक लसीकरण केंद्र तसेच गोवंडीतील झोपडपट्टी परिसरातील केंद्र पुरवण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT