मुंबई

मध्य रेल्वेची घोषणा ! मुंबई ते नागपूर दरम्यान धावणार विशेष 'उत्सव ट्रेन'

प्रशांत कांबळे

मुंबई : मध्य रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते नागपूर दरम्यान उत्सवासाठी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

02047 ही विशेष ट्रेन वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि दादर या स्थानकावर थांबणार आहे. तर यामध्ये एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, सात शयनयान आणि चार द्वितीय आसन श्रेणी राहणार आहे. 

प्रवाशांना सुपरफास्ट विशेष उत्सव ट्रेन क्रमांक 02048/ 02047 विशेष शुल्कासह तिकीट बुकिंग 12 डिसेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार असून, या विशेष गाड्यांच्या स्थानकांच्या थांब्यांची अधिक माहिती www.enquiry.indianrail.gov.in या वेब पोर्टलवर प्रवाशांना मिळणार आहे. तर कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

02048  सुपरफास्ट विशेष 'उत्सव ट्रेन' 13 डिसेंबर रोजी नागपूर येथून संध्याकाळी 6 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 7.45 वाजता पोहोचेल.

02047 सुपरफास्ट विशेष उत्सव ट्रेन 15 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रात्री 11.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 1.15 वाजता नागपूरला पोहोचेल.

central railways to run special utsav train from mumbi to nagpur read booking details

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT