Kapil-Patil sakal media
मुंबई

KDMC : वायू प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी मिळणार ३३ कोटींचा निधी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) हवेतील प्रदूषण (Air pollution) कमी करण्यासाठी मिलियन प्लस सिटी योजनेतून आराखडा तयार केला आहे. यासाठी महापालिकेला 33 कोटी 11 लाख रुपयांचा निधी (kdmc fund) मिळणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (kapil patil) यांनी यासाठी पाठपुरावा केला असून येत्या काही दिवसात पालिकेच्या तिजोरीत हा निधी येणार आहे. ( Central state minister kapil patil follow up for kdmc funding for air pollution control-nss91)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत डोंबिवली शहरालगत मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. याकरीता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने विकसीत स्थापत्य कामकाज व भविष्यकालीन विकसीत कामाचा कृती आराखडा तयार करून शहरातील हवेची गुणवत्ता कमी करण्याकरीता प्रस्ताव पालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविला आहे.

या कृती आराखड्यामध्ये वृक्षारोपण, उद्योनाचे नितनीकरण, संवर्धन, विद्युत गॅस शववाहिनी, वाहतुक कोंडीमुळे होणा-या वाहनांचे प्रदुषण कमी करण्यासाठी वाहतुक सिंग्नल तसेच विद्युत वाहने व त्याकरीता इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन, शहारात प्रदुषण रोखणेसाठी विंड ऑग्मेंटेशन, प्युरिफाईंग युनिट व हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्र उभारण्याकरीता आदि कामे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

या कामासाठी निधी मिळावा म्हणून केंद्रीय मंत्री पाटील यांनी पाठपुरावा केला. केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगानुसार मिलियन प्लस सिटी योजनेतून प्रक्रिया पूर्ण करीत लवकरच पालिकेच्या तिजोरीत हा निधी जमा होणार असल्याचे पाटील यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT