मुंबई

सीईटी प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर, विधी ५ वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा 11 ऑक्टोबरला

तेजस वाघमारे

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार विधी 5 वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 11 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. तसेच एमपीएड-एमएड, बीएड-एमएड, बीपीएड, बीए-बीएससी बीएड इंटिग्रेटेड या परीक्षेच्या तारखाही सीईटी सेलने जाहीर केल्या आहेत. मात्र एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक बिघडले. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने अनेक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा लांबणीवर गेल्या. उच्च शिक्षण विभागाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्यानुसार एएलबी 5 वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा 11 ऑक्टोबरला घेण्यात येईल. तर एमपीएड-एमएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 3 ऑक्टोबर, बीएड-एमएड 10 ऑक्टोबर, बीपीएड 11, बीए-बीएससी बीएड इंटिग्रेटेड 11 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा अद्याप झाल्या नसल्याने या एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. येत्या काही दिवसात या अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

( संपादन -सुमित बागुल )

CET entrance exam date declared exams will be on 11th October

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT