मुंबई

नाट्यशास्त्र विभागाच्या प्रभारी संचालकपदी चंदनशिवे! 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌ विभागाचे संचालक योगेश सोमण यांना रजेवर पाठवल्यानंतर विद्यापीठाने त्यांच्या जागी लोककला अकादमीचे विभआगप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांची प्रभारी संचालक म्हणून नेमणूक केली आहे. त्याबाबतचे पत्र त्यांना आज देण्यात आले. पुढील संचालकांची नेमणूक होईपर्यंत चंदनशिवे विभागाचा कार्यभार पाहणार आहेत. 

राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावर सोमण यांनी भाष्य केले. त्याबाबत एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शविला असतानाच विभागात योग्य शिक्षण मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. सोमण यांची हाकालपट्टी करेपर्यंत आंदोलन मागे घेत नसल्याने विद्यापीठ प्रशासनाने सोमण यांना तातडीने रजेवर पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे. सोमण यांची याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने ते रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी लोककला अकादमीचे डॉ. गणेश चंदनशिवे यांची नेमणूक करण्यात आली आहे. कुलगुरू, कुलसचिव आणि विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT