मुंबई

स्थलांतरित कामगार आणि बेघर लोकांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा मेन्यू बदलला, आता जेवणात मिळणार...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार आणि बेघर राहतात. लॉक डाऊनच्या काळात या सर्वांची राहण्याची आणि खाण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात येतेय. अशात बेघर आणि स्थलांतरितांना देण्यात येणाऱ्या खिचडीवरून गेल्या काळात टीका होताना पाहायला मिळाली होती. अशात आता प्रशासनाकडून बेघर आणि स्थलांतरित कामगारांना देण्यात येणाऱ्या खिचडी ऐवजी त्यांच्या जेवणात बदल करण्याचा निर्णय घेतलाय. आता या सर्वांना मुंबई महानगर पालिकेककडून छोले पाव आणि मटार भात देण्यात येणार असल्याचं समजतंय. 

मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार आणि बेघर राहतात. मुंबई महानगर पालिकेकडून सहा लाखांवर अन्नाची पाकिटे वितरित केली जातात. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार आणि बेघर लोकांची पोटं भरली जातायत. यावर दिवसाला एक कोटी ऐंशी लाखांचा खर्च येतोय. मुंबई महानगर पालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे कार्य मुंबईत राबवलं जातंय, अर्थात यामुळे यंत्रणेवरही ताण येत असल्याचं निदर्शनात येतंय.   

या आधी स्थलांतरित कामगार आणि मुंबईतील बेघर लोकांना चपात्या भाजी किंवा कधी खिचडी दिली जात होती. पुलाव किंवा राजमा भट देखील दिला जात होता यामध्ये आता महापालिकेने छोले पाव आणि मटार भात देण्यात येणार आहे.

change in the menu of migrant workers and homeless people staying in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT