Changes in traffic u turn Thakurli flyover transport closed mumbai esakal
मुंबई

Mumbai News : त्या यू टर्न वरील वाहतूक मार्गात बदल; ठाकुर्ली उड्डाणपूल जवळील डाव्या वळणावरील वाहतूक बंद

नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाणपूलावरून येऊन स.वा. जोशी शाळेजवळ यू टर्न मारून चोळेगाव मार्गे जातात. उड्डाणपूल जवळील हा यु टर्न रस्ता अपघातांना निमंत्रण देत होता. वाहने समोरासमोर येत असल्याने चालकांमध्ये वादावादी देखील होत होती.

याविषयी दै. सकाळने 17 एप्रिलला "यू टर्नमुळे अपघातांस निमंत्रण" या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेत तसेच अनेक वाहन चालकांच्या तक्रारींची दखल घेत शहर वाहतूक विभागाने डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाण पुलावरुन येऊन स. वा. जोशी शाळेजवळ डावे वळण घेऊन ठाकुर्ली रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मंगळवारपासून प्रवेश बंद केला आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे.

डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाण पुलावरुन येणारी व स.वा.जोशी शाळेमार्गे येऊन ठाकुर्ली चोळेगाव मार्गे जाणारी वाहने ही उड्डाणपूल जवळ यू टर्न मारत उड्डाणपूल खालील रस्त्याचा वापर करत चोळेगाव मार्गे जात होती. हा यु टर्न जवळील रस्ता अरुण असल्याने व तिन्ही मार्गे येणारी वाहने याचा वापर करत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व वाहनांची टक्कर होत होती.

वळण घेत असताना वाहने एकमेकांना घासत किंवा प्रसंगी ठोकर देत असल्याने वाहन चालकांमध्ये नियमित वादाचे प्रसंग होत होते. याविषयी दै. सकाळ ने एप्रिल महिन्यात वृत्त प्रसारित करत या समस्येला वाचा फोडली होती. शहर वाहतूक उप विभागाने या वृत्ताची दखल घेतली.

या अरुंद वळण रस्त्याविषयी वाहतूक विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. त्याची ही डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दखल घेत मंगळवारी प्रत्यक्ष वळण रस्त्याची पाहणी केली.

आणि ठाकुर्लीकडे जाणाऱ्या चालकांना पुलाजवळील वळण मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ठाकुर्लीतून डोंबिवली पश्चिमेत, पश्चिम रेल्वे स्थानक, कानविंदे चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना एकेरी मार्गिका उपलब्ध होणार आहे, असे गित्ते यांनी सांगितले.शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना कोंडीचा फटका नको म्हणून वाहतूक विभागाने विशेष दक्षता मोहीम सुरू केली आहे.

वाहतूक मार्गात बदल

डोबिंवली पश्चिमेकडुन बावनचाळ, ठाकुर्ली ब्रिज संपल्यावर जोशी हायस्कूलजवळून डावे वळण सेवुन टाकुली-बोळेगाव कडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना 'जोशी हायस्कुल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही सर्व वाहने डोबिंवली पश्चिमेकडुन बावनचाळ, ठाकुर्ली ब्रिजवरून ठाकुर्ली घोळेगाव कडे जाणारी वाहने ही पुढे नाना कानविंदे चौक येथे डावीकडे वळण घेवून पंचायत बावडी मार्गे इच्छित स्थळी जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : यवतमाळात महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी; विकृत तरुणाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT