मुंबई

गँगस्टर एजाज लकडावाला विरोधात आरोपपत्र दाखल

अनिश पाटील

मुंबई:  कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला विरोधात मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने आणखी एका प्रकरणात गुन्हा नोंदवून त्यात आरोपपत्र दाखल केले आहे. एजाज विरोधात आत्तापर्यंत 10 गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.  लवकरच 3 अन्य गुन्ह्यात त्याच्या विरोधात दोषारोपत्रात दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रसिद्ध दिग्दर्शक अवतार कोहली यांना 2004 मध्ये गुंड एजाज लकडावालाने 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकावले होते. या प्रकरणी कोहली यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली होती. त्यात एजाजच्या दोन शूटरला पोलिसांनी अटक केली होती. मात्र या गुन्ह्यांत पोलिसांनी एजाला फरार दाखवले होते. एजाज विरोधात हत्या, खंडणी सारख्या 80 हून अधिक तक्रारी असून मुंबईत 25 गुन्ह्यांची नोंद आहे. जोगेश्वरीच्या अमृतनगरमध्ये राहणाऱ्या एजाजवर तो अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता.

शाळेत असताना त्याने त्याच्या शिक्षिकेला मारहाण केली होती. त्यानंतर एजाज परिसरात छोट्या मोठ्या चोरी आणि मारामाऱ्या करू लागला. त्यावेळीच  'डी गँग'ची नजर त्याच्यावर पडली. पुढे राजनच्या सांगण्यावरून तो सुपाऱ्या घेऊ लागला. पायधुनी पोलिस ठाण्यात एजाजवर 2 हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यात तो अटकेत असताना 1997 मध्ये त्याला नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले होते. 

वैद्यकिय तपासणीसाठी त्याला मुंबईच्या जे.जे रुग्णालयात आणले असताना पोलिसांना हुलकावणी देऊन त्याने पळ काढला होता. त्या दिवसापासून पोलिस त्याच्या मागावर होते. त्यामुळे एका ठिकाणी स्थिर न राहता एजाज वारंवार आपली जागा बदलायचा. वेगवेगळ्या नावाने एजाज तब्बल 7 ते 8 देशात वावरत होता.

------------------

(संपादनः पूजा विचारे)

Chargesheet filed against gangster Ejaz Lakdawala

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT