मुंबई

दुबईत मॉलमध्ये सुपरवायझरची नोकरी देतो सांगून हजारोंची फसवणूक; बनावट जॉब लेटर आणि व्हिसाही दिला

विक्रम गायकवाड

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्यानंतर दुसऱ्या नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार व्यक्तीला एका महिलेने दुबईत मॉलमध्ये सुपरवायझरची नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून त्याच्याकडून 60 हजार रुपये उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेने या व्यक्‍तीस बनावट जॉब लेटर आणि व्हिसाही दिला आहे. एपीएमसी पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात फसवणुकीसह बनावट कागदपत्रे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू आहे. या महिलेने अशाच पद्धतीने अनेक बेरोजगारांना गंडा घातला असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव राजेश गोसावी (43) असे असून ते मुलुंड येथे राहतात. लॉकडाऊनमुळे राजेश गोसावी यांची नोकरी गेल्याने त्यांनी जस्ट डायलवर फोन करून नोकरी देणाऱ्या एजन्सीबाबत विचारणा केली. त्या वेळी जस्ट डायलकडून एका महिलेचा नंबर देण्यात आला. या नंबरवर गोसावी यांनी संपर्क साधल्यानंतर, त्यांना बायोडेटा पाठविण्यास सांगण्यात आले. गोसावी यांनी बायोडेटा पाठवल्यावर संबंधित महिलेने फोन करून दुबई येथील मॉलमध्ये नोकरी असून त्यासाठी 37 हजार प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असे सांगितले. रक्कम भरण्याची तयारी गोसावी यांनी दाखविल्यानंतर, संबंधित महिलेने एपीएमसी मार्केटमधील ग्रोहितम बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावरील कार्यालयात त्यांना बोलावले. या ठिकाणी गोसावी यांनी 37 हजार रुपये भरल्यावर त्यांना बनावट जॉब नियुक्ती पत्र व बनावट व्हिसा देण्यात आला. त्यानंतर पुन्हा 18 हजार 800 रुपये भरण्यास सांगण्यात आले. पैसे भरूनही नोकरीबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने गोसावी यांना संबंधित महिलेवर संशय आला. त्यांनी संबंधित कार्यालयात धाव घेतली असता, कार्यालय बंद होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोसावी यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस संबंधित महिलेचा शोध घेत आहेत. 

Cheating thousands by claiming to be a supervisor in a mall in Dubai Fake job letter and visa also given

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Walking 10000 Steps: दररोज 10,000 पावले चालल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितले शरीरात दिसणारे 5 बदल

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

SCROLL FOR NEXT