मुंबई

मुंबईतील 'हा' भाग आजही ठरतोय कोरोनाचा हॉटेस्ट स्पॉट, मुंबईकर 100 टक्के काळजी घायलाच हवी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई उपनगरामधील चेंबूर परिसरात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच  विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना वेसण घालण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून राबविण्यात येत आहेत. असं असताना देखील चेंबूर परिसरात दिवसाकाठी 70 पर्यंत कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने ही रुग्णसंख्या वाढ पालिकेची डोकेदुखी ठरत आहे.

उपनगरातील महत्वाचे असलेल्या  चेंबूर, टिळकनगर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून येतंय. या परिसरातील समाजसेवकांनी आवाज उठविल्यावर पालिकेने या परिसरातील इमारतीत जनजागृती आणि अँटीजेन चाचणीला सुरवात केली. या परिसरातील इमारतींमधील लोकांनी याला चांगला प्रतिसाद देखील दिला. मात्र आता आता चेंबूर परिसरातील सुभाष नगर, युनियन पार्क, चेंबूर कॅम्प परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरवातीला चेंबूर, टिळकनगर परिसरात दिवसाला एकूण 10 कोरोना रुग्ण सापडत होते. आता हा आकडा 70 पेक्षा अधिक झाला असल्याने चेंबूर  एम पश्चिम विभागात कोरोना रुग्णाची संख्या आतापर्यंत एकूण 10 हजार वर गेली आहे.

चेंबूर परिसरातील बाहेरून येणारे रिक्षाचालक, भाजीविक्रेते, मासे विक्रेते तसेच कोणतेही फेरीवाले पालिकेचे नियम धुडकावून राजरोसपणे विक्री करीत आहे. लग्नसोहळ्यात 300 लोक जमणे, पालिकेला नागरिक कोणतेही सहकार्य न करणे, उपहार गृहात गर्दी करणे आणि गर्दीच्या ठिकाणी पालिकेचे नियम धाब्यावर बसवीत असल्याने ही रुग्ण संख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे. पॉझिटिव्ह रुग्ण तसेच विलगिकरण करण्यात आलेले रुग्ण बिनधास्त बाहेर फिरत असल्याने कित्येकांवर पालिकेने कारवाई केलेली असताना देखील नागरिक कोणतीही काळजी घेताना आजही दिसत नाही.

लसीकरण केंद्रावर होत असलेली गर्दी आणि कोरोना रुगणांची होणारी वाढ लक्षात घेऊन पालिकेने चेंबूर परिसरासतील खाजगी रुग्णालय इनलॅक हॉस्पिटल,  टिळक नगर परिसरातील राणे रुग्णालय एसआरव्ही रुग्णालय, सुराणा रुग्णालय,  हिंदु महासभा रुग्णालय येथे लसीकरण केंद्रे सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. त्या रुग्णालयात जाऊन लसीकरणं करून घ्यावे व कोरोना आटोक्यात आणण्याकरिता पालिकेला सहकार्य करावे असे आव्हान पालिकेने केले आहे. 

वैद्यकीय अधिकारी एम पश्चिम विभाग डॉ. भुपेंद्र पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. चेंबूर परिसरात कोरोनाचे दरोरोज एकूण 70 पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. अशात नागरिकांचा निष्काळजी पणा, कोणतीही खबरदारी न घेणे, मैदानात बिनधास्त खेळणे, लग्नकार्यात 50 पेक्षा अधिक लोक येणे, तोंडाला मास्क न लावणे यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढतीये. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी बाहेर फिरू नये. ज्यांना त्रास होत असेल त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेणे. विलगीकरण करण्यात आले असेल तर त्यांनी बाहेर फिरू नये. ज्यांना मोफत लसीकरण करून घ्यायचे असेल त्यांनी पालिकेच्या रुग्णालयात जाऊन घेणे. किंवा ज्यांना खासगी रुग्णालयात लसीकरण करून घ्यायचे असेल त्यांनी खाजगी रुग्णालयात लसीकरण करावे असं ते म्हणालेत. 

chembur and tilaknagar areas are becoming critical hotspot of corona in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT