Varsha Gaikwad Statement  sakal media
मुंबई

वर्षा गायकवाड म्हणतात 'तो' पेपर फुटलाच नाही, केवळ काही भाग व्हॉटसअपवर दिसून आला

विधानपरिषदेत दिले निवेदनाद्वारे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या रसायनशास्त्राचा पेपर (chemistry paper leak) फुटलाच नाही. प्रश्नपत्रिकेतील काही भाग केवळ व्हॉटस्ॲपवर (what's app) प्रसारित झाला, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी आज विधान परिषदेत केले. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यासंदर्भात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व प्रकरणाची शिक्षण मंडळाकडून (Education Board) तपासणी केली जाईल आणि कडक कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी एका निवेदनाद्वारे दिली.

बारावीचा रसायनशास्त्र विषयाचा पेपर विलेपार्ले येथील एका परीक्षा केंद्रावर फुटल्याचे विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी आज सभागृहात सांगितले. त्यावर बोलताना गायकवाड म्हणाल्या, की पेपर फुटला नाही; परंतु विलेपार्ले येथील परीक्षा केंद्र क्रमांक ३६०१ मध्ये सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी पेपरचा काही भाग एका मुलीच्या व्हॉटस्ॲपवर दिसला. एक विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर उशिरा आल्याने तिचा मोबाईल तपासण्यात आला. त्यात रसायनशास्त्राच्या पेपरचा काही भाग होता.

नेहमीच्या वेळेपेक्षा ती उशिरा केंद्रावर हजर झाली होती. संबंधित विद्यार्थिनीला विलेपार्ले पोलिस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल चौकशी सुरू असल्याचेही गायकवाड यांनी सभागृहात सांगितले. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर पेपर वाचायला दिला जातो. त्याच दरम्यान पेपर मोबाईलवरून व्हायरल करण्यात आल्याचे आढळून आले; पण पेपर फुटलेला नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी सभागृहात दिले.

विभागीय मंडळ करणार चौकशी

व्हॉट्सॲपवर पेपर व्हायरल झाल्याने पोलिसांत गुन्हा दाखल झाला असला, तरी त्याबाबत राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाकडून स्वतंत्ररीत्या चौकशी केली जाणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यापुढे मोबाईल घेऊन जाता येणार नाही यासाठी कडक अंमलबजावणीही केली जाईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'अतिवृष्टी नुकसान मदतीला पंचनाम्याचा अडथळा'; एकाही जिल्ह्याचा अंतिम अहवाल नाही; शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT