Chhagan Bhujbal attack on Shinde Fadnavis government 
मुंबई

Bhujbal on CM Shinde: "आता शिवसेना सोडणं सोप आहे"; मराठा आरक्षणावरुन भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप अन् टोला

काल ओबीसी नेत्यांची भुजबळांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं मराठा समाजाची अधिसूचना भुजबळांनी शांतपणे वाचावी असा सल्लाही त्यांनी दिला.

त्यांच्या या विधानावर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांवर आरोप केला तसेच आता शिवसेना सोडणं सोप आहे अशा शब्दांत त्यांना टोलाही लगावला. (Chhagan Bhujbal on CM Eknath Shinde over Maratha reservaion after meeting with obc leaders)

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत असताना ओबीसी समाज असेल इतर समाज असेल कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता, त्यांचं आरक्षण कमी न करता, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता आरक्षण देण्याची भूमिका पहिल्या दिवसा पासून आहे. जे नोटिफिकेशन आहे ते इतरही समाजाला मार्गदर्शक ठरेल. त्यामुळं छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत त्यांनी व्यवस्थितीत याची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल.

भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप अन् टोला

कालपासून आम्ही तेच सांगतोय की, अध्यादेश आम्ही शांतपणे वाचण्याचं काम करतो आहोत म्हणूनच शांतपणे बोलण्याचं देखील काम करतो आहे. मला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देताना पहिल्यांदा विश्वासात घेतलं ते म्हणजे निजामशाहीत त्यांच्या नोंदी सापडल्या तेव्हा. त्यासोडून त्यांना आपण कुणबी प्रमाणपत्र द्यायचं यावर मी सहमती दर्शवली.

पण याची जी व्याप्ती वाढत गेली आणि अधिसूचना काढली त्यावर माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली नाही. मी ३५ वर्षांपासून ओबीसींसाठी राजकारण करतो आहे. त्यावेळी मी शिवसेना सोडली त्यावेळी तुमचा जन्मही झाला नसेल, ती परिस्थिती कशी असेल आता शिवसेना सोडणं सोपं आहे, अशा शब्दांत भुजबळांनी शिंदेंना टोलाही लगावला. तेव्हापासून आम्ही लढतो आहोत आणि लढत राहू असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. (Latest Marathi News)

फडणवीसांना प्रत्युत्तर

नारायण राणे, छगन भुजबळ यांच्याशी आपण चर्चा करुन आम्ही काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आणून देऊ, मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही चांगला सुवर्णमध्य काढलेला आहे, फडणवीसांच्या या विधानावर भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, ओबीसींना धक्का लावत नाही म्हणायचं आणि दुसरीकडं लाखो-करोडो मराठा समाजाचे बांधव कुणबी प्रामाणपत्र घेऊन कुणबीत सामील होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT