Chhaya Waghmare 10th Exam Result esakal
मुंबई

10th Exam Result : जिद्द असावी तर अशी! वयाच्या 51 व्या वर्षी छाया वाघमारेंनी दहावीत मिळवले 'इतके' टक्के गुण

छाया वाघमारे (Chhaya Waghmare) यांनी वयाच्या 51 व्या वर्षी 10 वी परीक्षेत 66 टक्के गुण मिळवित घवघवीत यश संपादन केले आहे.

शर्मिला वाळुंज

35 वर्षाच्या गॅपनंतर छाया यांनी पहिल्या प्रयत्नांतच दहावीची परीक्षा (10th Exam Result) उत्तीर्ण केली आहे. छाया वाघमारे या डोंबिवली पश्चिमेला राहतात.

डोंबिवली : डोंबिवलीत राहणाऱ्या छाया वाघमारे (Chhaya Waghmare) यांनी वयाच्या 51 व्या वर्षी 10 वी परीक्षेत 66 टक्के गुण मिळवित घवघवीत यश संपादन केले आहे. लहान वयात लग्न (Marriage) झाल्याने संसाराची जबाबदारी अंगावर पडली. घरची परिस्थिती बेताची त्यावर मात करत दोन मुलांचे शिक्षण पूर्ण करत मुलीचे लग्न देखील लावून दिले. यानंतर आपल्या शिक्षणाची जिद्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी 10 वी ला प्रवेश घेतला.

35 वर्षाच्या गॅपनंतर छाया यांनी पहिल्या प्रयत्नांतच दहावीची परीक्षा (10th Exam Result) उत्तीर्ण केली आहे. छाया वाघमारे या डोंबिवली पश्चिमेला राहतात. मूळच्या कोल्हापूरच्या (Kolhapur) असलेल्या छाया यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. मात्र, लहान वयातच लग्न झाल्याने संसाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांना एक मुलगा व मुलगी असून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरी केली. पतीचे अकाली निधन झाले आणि मुलांची जबाबदारी छाया यांच्या खांद्यावर आली.

मात्र, नडगमुकता परिस्थितीवर मात करत त्यांनी नोकरी करत संसाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केली छाया यांची दोन्ही मुले प्रथमेश आणि प्रियंका यांनी उच्च शिक्षण घेतले असून दोघेही नोकरी करतात. छाया यांच्या मुलींचे लग्न वर्षभरापूर्वी झाले आहे. मुलीचे लग्न झाल्यानंतर संसारातून थोडा मोकळा वेळ मिळाल्याने आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले. मागील वर्षीच त्यांनी नर्सिंग ची परीक्षा दिली असून त्यात त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. यानंतर त्यांनी दहावीची परीक्षा देखील देण्याचे ठरवले.

मुंबई येथील व्ही.एस.एम. भायखळा नाईट हायस्कूल येथे अॅडमिशन घेतले. कोणताही क्लास लावलेला नसताना केवळ शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमावर नियमित दिवस रात्र सराव करत त्यांनी परीक्षेत 66.20 टक्के गुण प्राप्त केले आहेत. यावेळी छाया यांनी बोलताना सांगितले, की परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा मला खूप आनंद आहे. शाळेतील मुख्याध्यापक आनंद पाटील सर त्याचबरोबर सुरेश काळे, कदम, गटरी, मासूम ट्रस्टचे खर्डे सर, कविता गीते मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच मला 10 वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT