या जिल्ह्यात कोरोनाबाधितांना चिकन 
मुंबई

या जिल्ह्यात कोरोनाबाधितांना चिकन; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

राहुल क्षीरसागर

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यात येथील उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांची रुग्णालय प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चांगली प्रथिने मिळावीत, यासाठी मांसाहार पदार्थांची आवश्यकता असते. त्यामुळे त्या कोव्हिड रुग्णांना उकडलेल्या अंड्याबरोबर आठवड्यातून एकदा चिकनकरीसुद्धा मिळणार आहे. हे चिकन बुधवारी सकाळी जेवणातून दिले जाणार असून, त्याची सुरुवात आजपासून करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय एप्रिल महिन्यात कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. या रुग्णालयात सध्याच्या घडीला कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णालयात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करण्यात येत असून, सध्यच्या घडीला या रुग्णालयात सुमारे 200 ते 230 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांना रुग्णालय प्रशासनाकडून सकाळी नाश्ता व दुपारी आणि रात्री जेवण देण्यात येत असते. यासाठी मागील तीन महिन्यांपासून दिवसरात्र एका करीत (भोजन कक्षात) आहारतज्ज्ञ यांच्यासह पाच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात कोव्हिड रुग्णांना सकाळच्या नाश्तामध्ये ग्रीन किंवा लेमन टी याच्यासह दोन अंडी, दूध तसेच जेवणामध्ये मोड आलेले पण हळद, मीठ टाकून उकडलेले कडधान्य, गोड पदार्थ, एक फळ आणि टोमॅटो सूप याच्यासह डाळ- भात, भाजीपोळी असे दररोज दिले जात आहे.

 रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी व त्यांना सकस आहार मिळावा यासाठी प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी रुग्णांना नाश्ता म्हणून आम्लेट ब्रेड दिले जात आहे. पण, कोव्हिड रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड्यातून एकदा जेवणात चिकन देण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आजपासून जेवणाच्या ताटात चिकन देण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगल्या प्रथिनांचा आहारात वापर केला जातो. त्यामुळे त्या आहाराचा रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी फायदा होतो. म्हणून सुरू असलेल्या उकडलेल्या अंड्याबरोबर आम्लेट ब्रेड यासारखे आहार दिले जात आहेत. त्यातच रुग्णांच्या जेवणात आजपासून चिकनचा समावेश करण्यात आला असून 'चिकनकरी' हे आठवड्यातून एकदा रुग्णांना देण्यात येणार आहे. 
- प्रिया गुरव, आहारतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paper Leak Bill: मोठी बातमी! पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार; मोदी मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी, तरतुदी काय?

नीट परीक्षेतील गैरप्रकारांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; सरकारच्या कामकाजावर ठेवणार बारीक नजर

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील विसर्ग ४,७०८ क्युसेक; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् 48 हजार कोटींची वीज बिले माफ; काय म्हणाले आमदार गाडगीळ, खाडे?

Delhi Police Officer Resignation :'जंतर-मंतरवरील पोरांना मारू शकत नाही'; दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्याने दिला राजीनामा? व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT