चिकन स्वस्त झाले आहे.
चिकन स्वस्त झाले आहे. 
मुंबई

चिकनला स्वस्ताईची फाेडणी

अरविंद पाटील

रोहा : कोरोना व्हायरस आणि त्याअनुषंगाने समाजमाध्यमांवर अफवा पसरवणाऱ्या संदेशांमुळे चिकनच्या विक्रीत तब्बल 30 ते 40 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात त्याच्या भावात किलोमागे सुमारे 20 रुपयांची घसरण झाली आहे. काही वर्षांपूर्वी "बर्ल्ड फ्लू'ची साथ पसरली होती. त्या वेळीही अशीच स्थिती होती. 

चीनमध्ये कोरोना विषाणूने 400 पेक्षा अधिक जणांचा बळी घेतला आहे. त्यानंतर प्रत्येक देशात खबरदारी घेण्यात येत आहे. या संदर्भातील संदेश प्रसारित झाले आहेत. मात्र, समाजमाध्यमात चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडले असल्याच्या अफवा पसरवणारे संदेश प्रसारित झाल्याने खवय्ये धास्तावले. त्यांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्याची विक्री सुमारे 30 ते 40 टक्‍क्‍यांनी घसरली असून किमतीत किलोमागे 20 रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारातही भाव कमी झाले आहेत. 

गेल्य आठवड्यात चिकनचा घाऊक बाजारात भाव प्रति किलो 90 ते 100 रुपये होता; तर किरकोळ 120 ते 130 रुपयांपर्यंत होता. आता घाऊक बाजारात भाव 20 ते 30 रुपयांनी घसरून 70 ते 80 रुपये प्रति किलो झाला आहे. किरकोळ बाजारात चिकन प्रति किलो 100 ते 110 रुपये किलोने विकण्यात येत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. त्यामुळे विक्रेते आणि पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. काही वर्षांपूर्वी "बर्ल्ड फ्लू'ची साथ पसरली होती. त्यावेळी या व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागले होते.

धक्कादायक : गंठण चोरणारा उद्या मरेल 

...म्हणून पोल्ट्री मालक अडचणीत 
पोल्ट्रीत पिल्लू सोडण्याच्या आठवडाभर आधी त्याची शेडची साफसफाई करून त्यात निर्जंतुकीकरण फवारणी व धुरी दिली जाते. त्यांचे लसीकरण करण्यात येते. पिल्लांची वाहतूक करणारी वाहने निर्जंतुक करण्यात येतात. शेडमध्ये पिल्ले सोडल्यानंतर त्यांना दिलेले खाद्य निर्जंतुक केलेले असते. दर आठवड्याला पिल्लांना रोगप्रतिबंधक औषधे व लसी दिल्या जातात. त्यामुळे ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोल्ट्री व्यावसायिक व कृषितज्ज्ञ सिद्धेश सरफळे यांनी केले. 

चीनमध्ये कच्चे मांस खाल्ले जाते. त्यामुळे त्या देशात मांसातून विषाणूजन्य आजारांचा फैलाव होऊ शकतो. भारतात मांस चांगले शिजवण्यात येत असल्याने विषाणूजन्य आजाराचा फैलाव होण्याची शक्‍यता नाही. 
- दिलीप बागडे, डॉक्‍टर 

चीनमध्ये फैलावलेल्या व्हायरसबाबत गैरसमज पसरवणाऱ्या संदेशांचा परिणाम होऊन विक्रीत 30 ते 40 टक्के घट झाली आहे. किमतीतही किलोमागे 20 ते 30 रुपयांची घट झाली आहे. 
- नबिल म्हसलाई, चिकनविक्रेते 

पोल्ट्री उद्योगात कोंबड्याचे आरोग्य व निर्जंतुकीकरण यांची अत्यंत उच्च पातळीवर काळजी घेतली जाते. त्यामुळे चिकनमधून कोणत्याही प्रकारचा रोग पसरण्याची शक्‍यता नाही. 
- शुभम सरफळे, पोल्ट्री व्यावसायिक 
.................. 
चिकनच्या किमती (प्रति किलो / रुपयांत) 

तारीख घाऊक किरकोळ 

1 फेब्रुवारी 90 ते 100 120 ते 130 

2 फेब्रुवारी 70 ते 80 100 ते 110 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT