Eknath Shinde sakal
मुंबई

Eknath Shinde: राज्यातील कोणीही उपचारावीना राहणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली जनतेला ग्वाही

महिलांच्या आरोग्याची चिंता; राज्यातील प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण उपचारांची हमी |Women's health concerns; Ensuring quality treatment to everyone in the state

सकाळ वृत्तसेवा

संपूर्ण राज्यात आरोग्य विभागाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्या अंतर्गत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील कोणीही उपचारविना राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा-भाईंदर येथे दिली.

मिरा-भाईंदर महापालिकेच्या मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. महिला स्वतःची तपासणी करून घेण्यासाठी टाळाटाळ करतात.

कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यासाठी आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन राज्यातील चार कोटी महिलांची तपासणी केली. कोणत्याही आजाराचे लवकर निदान झाले, तर आजार बरा होतो आणि रुग्णाचा जीव वाचतो.

सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखावरून पाच लाख केली आहे. त्याचा राज्यातील साडेबारा कोटी जनतेला फायदा झाला. राज्यात फिरती आरोग्यसेवाही सुरू आहे. मुंबई महापालिकेनेही घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याचे अनुकरण मिरा-भाईंदर महानगरपालिकेने करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

महापालिकेच्या मिरा रोड येथील नियोजित कर्करोग रुग्णालयासाठीही शासन सर्वतोपरी मदत करेल. महापालिकेने उभारलेल्या कॅशलेस रुग्णालयाच्या माध्यमातून लोकांना उत्तम आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे, याचे समाधान वाटते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या वेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, माजी आमदार रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त संजय काटकर, पोलिस आयुक्त मधुकर पांडेय, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे उपस्थित होते.

विकासकामे जोरात

आधीच्या सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केवळ अडीच कोटी रुपयांची मदत करण्यात आली; मात्र आपले सरकार आल्यानंतर दीड वर्षात तब्बल १८० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. आधीच्या सरकारच्या काळात बंद पडलेल्या विकासकामांना गती देण्यात आली असून, ती राज्याची दिशा बदलवणारी ठरत आहेत.

कनेक्टिव्हिटी वाढणार

राज्य सरकारकडून ॲक्सेस कंट्रोल ग्रीड तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत राज्याच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सहा ते सात तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. पनवेल ते गोवा अवघ्या चार तासांत जाता येणार आहे, अशी कनेक्टिव्हिटी तयार करण्याचे काम सुरू आहे

डीप क्लीन चळवळ

डीप क्लीन ही आता एक चळवळ झाली आहे. मुख्यमंत्री स्वत: रस्त्यावर उतरून स्वच्छता करत असल्यामुळे संपूर्ण यंत्रणा कार्यरत होते. या मोहिमेत तरुण, वरिष्ठ नागरिक, महिलाही स्वत:हून सहभागी होत आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेने शाळांचा दर्जा सुधारावा. त्यासाठी लागेल ती मदत करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Hockey India League : नवनीत कौर आणि जर्मनप्रीत सिंग करणार एसजी पायपर्सचे नेतृत्व; उपकर्णधारांचीही घोषणा

मोठी बातमी! शाळा बंद आंदोलनातही सुरू होत्या २१६२ शाळा; सोलापूर जिल्ह्यातील १७,८०० शिक्षक शाळा बंद आंदोलनासून राहिले दूर

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT