मुंबई

आज दुपारी १ वाजता मुख्यमंत्री असणार लाईव्ह, साधणार राज्यातल्या जनतेशी संवाद 

पूजा विचारे

मुंबईः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी राज्यातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. दुपारी १ वाजता सोशल मीडियावर लाईव्ह येऊन मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील. आज बरेच दिवसानंतर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्यानं सर्वांचंचं लक्ष त्यांच्या संवादाकडे लागून राहिलं आहे. 

राज्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा, कंगना प्रकरण आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकारण. तसंच मराठा आरक्षण यावर मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 

कोरोनावर काय बोलतील? 

सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राज्यातील कोरोनाचा प्रसार कसा रोखावा असा महत्त्वाचा प्रश्न सर्वांना पडला आहे. राज्यात सध्या अनलॉक सुरु झालं आहे. त्यात मंदिरं, रेस्टॉरन्ट सुरु करण्याची मागणी केली जात आहे. लोकल रेल्वेही सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. 

मराठा आरक्षणावर काय बोलणार? 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधक पेटून उठले आहेत. न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर भाजपनं ठाकरे सरकारला टार्गेट केलं आहे. 

कंगनावर काय बोलणार? 

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावत पहिल्यापासून वादग्रस्त वक्तव्य करत आहे. त्यानंतर कंगनानं ड्रग्स प्रकरण, तसंच  महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. कंगनानं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेखही केला आहे. शिवसेना आणि कंगना असा वाद रंगला आहे. कंगनानं वारंवार शिवसेना आणि मुख्यमंत्री यांच्याविरुद्ध वादग्रस्त ट्विटही केलेत. त्यामुळे मुख्यमंत्री यावर नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Chief Minister Uddhav thackeray live at 1 pm today interact with the people

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT