विजय वडेट्टीवार  File photo
मुंबई

महाराष्ट्रात दोन दिवसात संपूर्ण लॉकडाउनबद्दल होणार निर्णय

विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती.

दीनानाथ परब

मुंबई: "कोरोनाची दुसरी लाट एवढी भयंकर असेल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. दुसरी लाट सौम्य स्वरुपाची असेल असं तज्ञाचं मत होतं. सध्या लॉकडाउनचं नियोजन ३० एप्रिल पर्यंत आहे. पण पुढे ही वाढलं तर तसं नियोजन केलं जाईल" असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

"कोविड रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर आहे. केंद्र सरकारकडून यावर्षी कोविडसाठी अजून पैसे आलेले नाहीत. १६०० कोटी रुपये अपेक्षित आहेत. पुढच्या काही दिवसात ते पैसे येतील. अनेक जिल्ह्यातून जम्बो रुग्णालयांची मागणी येतेय. त्यासाठी ७५ टक्के निधी केंद्र आणि २५ टक्के निधी राज्य देईल. ५५०० कोटी रुपये कोविडसाठी राखीव ठेवले आहेत" असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

"दिल्लीने लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती आम्ही घेत आहोत. तिथेही लोकल सेवा आहे, ते कशा पद्धतीने नियोजन करतायत त्यावर चर्चा करु" असे वडेट्टीवार म्हणाले. "कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी केली. पण त्याचा फायदा पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही" असे वडेट्टीवार म्हणाले.

"आपण सध्या संचारबंदी केली आहे. लॉकडाउन म्हणजे पूर्ण बंद काहीच मिळणार नाही. लॉकडाउनला काही व्यापाऱ्यांचा विरोध होता. आता लॉकडाउन शंभर टक्के करा, अशी लोकचं मागणी करतायत. व्यापाऱ्यांची सुद्धा मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत याची माहिती पोहोचवली आहे. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री लॉकडाउन संबंधी निर्णय घेतील" असे वडेट्टीवार यांनि सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : ब्रह्मपुरी, वर्ध्याचा पारा ४७ अंशांवर; विदर्भात आणखी दोन दिवस रेड अलर्ट, पावसाचं आगमन कधी होणार?

Eye Care Tips : स्क्रीन बघताच डोळे दुखू लागतात? मोबाईल अन् लॅपटॉपमध्ये लपलेल्या 'या' 2 सेटिंग करा सुरू; मिनिटात मिळेल आराम

Vinesh Phogat: खेळाडूंविरुद्ध सूडबुद्धीने वागू नका...!" हायकोर्टाने कुस्ती संघटनेला झापले; विनेश फोगाट प्रकरणात मोठा ट्विस्ट

पुण्यात ‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’चा दिमाखदार शुभारंभ!

BJP MLA: "वर्गात 'येस सर' ऐवजी 'जय श्री राम' म्हणा..." ; भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे वाद!

SCROLL FOR NEXT