मुंबई

लहान मुलं कोरोनाचे वाहक ठरू शकतात, काळजी घेण्याचे ICMRचे आवाहन

मिलिंद तांबे

मुंबई: लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी ते कोरोनाचे वाहक ठरू शकतात अशी माहिती आता समोर आली आहे. भारतीय वैद्यकीय परिषद ( आयसीएमार) ने याबाबतचा खुलासा केला असून  लहान मुलांसह किशोरवयीन मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

देशात लहान मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. देशात 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण केवळ 8 टक्के इतके असून राज्यात हेच प्रमाण 6.78 इतके आहे. राज्यात आतापर्यंत 1,17,929 किशोरवयीन मुलांना कोविडची बाधा झाली आहे, असे असले तरी या मुलांपासून कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असून ते सुपर स्प्रेडर्स पेक्षा अधिक संसर्ग पसरवू शकतात असे ही  परिषदेने स्पष्ट केले आहे.

भारतीय वैद्यकीय परिषदेचे संचालक बलराम भार्गव यांनी याबाबत माहिती दिली. देशभरात कोरोना संसर्ग पसरला असला तरी लहान मुलांमध्ये कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण हे कमी आहे. याशिवाय मृत्यूदर ही नगण्य आहे. 5 वर्षांखालील मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण हे अत्यल्प आहे. मात्र काही राज्यांमध्ये लहान मुलांमधील संसर्गाचा आकडा हा 350 च्यावर असून तेथे हा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे ही ते म्हणाले.

कावासाकी आणि कोरोना संसर्गाची लक्षणे ही सारखीच आहेत. कावासाकी आजार ही लहान मुलांसाठी जिवघेणा ठरू शकतो. मात्र आपल्याकडे अजून कोरोना बाधितांमध्ये  कावासाकी आजार असलेले आढळलेले नाही. कावासाकी आजार हा 5 वर्षाच्या आतील लहान मुलांना अधिकतर होतो.  यामुळे ताप, रक्तातील रक्तबिंबिकेचे प्रमाण वाढणे तसेच ह्रदयाला रक्त पुरवठा करणा-या रक्तवाहिन्या नष्ट होणे अशा प्रकारचा त्रास होतो. यातच कोरोनाची बाधा झाल्यास ते जीवघेणे ठरू शकते.

लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे सहसा आढळत नाहीत. लहान मुलांची कोरोना चाचणी शक्यतो केली जात नाही. त्यामुळे ते सायलेंट स्प्रेडर ठरू शकतात असे मत महाराष्ट्र मेडीकल काऊंसिलचे अध्यक्ष डॉ शिवकुमार उतुरे यांनी नोंदवले. अशा मुलांपासून इतर मुलांना तसेच त्यांच्या पालकांना बाधा होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे सध्या मुलांची काळजी घेणे महत्वाचे आहे. मुलांना शाळेत  पाठवणे, कोणत्याही शिकवणीला पाठवणे, मुलांना एकत्र खेळायला पाठवणे हे टाळणे गरजेचे असून याबाबत पालकांनी काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे ही डॉ. उतुरे म्हणाले.

या आजाराचा महिलांपेक्षा पुरूषांना याचा धोका अधिक आहे. मात्र इतर कोरोना बाधित देशांपेक्षा भारतात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे ही डॉ उतुरे म्हणाले. आपल्याकडे या आजाराचे प्रमाण कमी असले तरी यामुळे ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांवर याचा परिणाम होत असल्याने ह्रदयविकाराचा तीव्र झटका येण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे सर्वांनीचा लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे ही ते पुढे म्हणाले.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Children can be carriers of corona virus ICMR appeal for care

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठा-ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'हैद्राबाद गॅझेटचा शब्दनशब्द मी..', सरकारच्या निर्णयावरही केली टीका

Ujani Dam Update : उजनीतून भीमा नदी पात्रात १ लाखाहून अधिक क्युसेक्सने विसर्ग; भीमा नदीला पूर स्थिती, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Ladki Bahin Yojana: तब्बल ४ लाख बोगस लाडक्या बहिणींनी सरकारला लावला चुना, पडताळणीत धक्कादायक बाब उघड; नेमकं काय घडलं ?

Latest Marathi News Updates : सोलापूरमध्ये पावसाची मुसळधार! पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

Asia Cup 2025: टीम इंडियाला पाकिस्तानचा 'अपमान' करण्याची पुन्हा संधी; 'या' तारखेला India vs Pakistan समोरासमोर येणार; जाणून घ्या कसं

SCROLL FOR NEXT