Mumbai High Court Sakal media
मुंबई

आई-वडील हयात असेपर्यंत मालमत्तेवर मुलांचा हक्क नाही - मुंबई हायकोर्ट

याचिकेच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयात निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आई-वडील हयात असेपर्यंत (Parents Alive) मुलांचा त्यांच्या मालमत्तेवर (Property right) कोणत्याही प्रकारचा हक्क असू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) एका निकालात स्पष्ट केले आहे. आई-वडील जिवंत असताना असा हक्क मागणेही हास्यास्पद असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. पती मागील दहा वर्षांपासून डिम्नेशिया आजाराने (Dementia disease) त्रस्त असून कोमामध्ये आहेत. त्यांच्या नावावर असलेला फ्लॅट आणि त्यांचे पालकत्व मिळावे, हा फ्लॅट विकून मिळणाऱ्या पैशांतून त्यांच्या औषधांचा आणि अन्य खर्च करायचा आहे, अशी मागणी पत्नीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती.

या मागणीला त्यांच्या मुलाने विरोध करत स्वतंत्र अर्ज केला आहे. या अर्जात आई किंवा वडील यांच्या नावावरील फ्लॅटवर मुलगा या नात्याने माझा हक्क आहे, असा दावा मुलाने केला होता. यावर न्या. गौतम पटेल आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने मुलाचा अर्ज नामंजूर केला आहे.

मुलगा या नात्याने आई किंवा वडिलांच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये ते हयात असेपर्यंत मुलगा भागीदारी किंवा हक्क सांगू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आईला न्यायालयाने वडिलांचे पालकत्व देत फ्लॅटचा व्यवहार करण्याची मुभा दिली आहे. मात्र अंतिम व्यवहार न्यायालयाच्या परवानगीने करण्याचा आणि सर्व हिशोब लिखित स्वरूपात पतीच्या उपचारासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत.

युक्तिवाद अतार्किक

वडिलांचे दोन्ही फ्लॅट ही भागीदारी असलेली मालमत्ता आहे आणि मुलगा या नात्याने या मालमत्तेवर माझा अधिकार आहे, असा युक्तिवाद मुलाच्या वतीने करण्यात आला होता. मात्र हा युक्तिवाद अतार्किक, आधारहिन आणि हास्यास्पद आहे, असे खंडपीठाने सुनावले. कोणत्याही वारसा हक्कानुसार मुलाला त्याचे आई-वडील हयात असताना त्यांच्या फ्लॅटमध्ये हिस्सा मिळू शकत नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने मुलाचा हस्तक्षेप अर्ज नामंजूर केला. वडिलांच्या नावावर एक फ्लॅट असून आईच्या नावावर एक फ्लॅट आहे. मुलगा आई-वडिलांपासून वेगळा राहतो, असे याचिकेत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT