आवक घटल्याने लज्जतदार चिंबोरी महागली; "हे" आहेत सध्याचे दर... 
मुंबई

आवक घटल्याने लज्जतदार चिंबोरी महागली; "हे" आहेत सध्याचे दर...

सकाळ वृत्तसेवा

पाली : लॉकडाऊनमुळे ज्याप्रमाणे मासळीची आवक कमी झाली त्याप्रमाणेच खाऱ्या पाण्यातील म्हणजे समुद्र व खाडीत मिळणाऱ्या लज्जतदार चिंबोऱ्यांची आवक कमी झाली. ऐन चिंबोऱ्या मिळण्याचा हंगाम सरला असून, सध्या या चिंबोऱ्या महागल्या आहेत. एक मध्यम आकाराची चिंबोरी 50 ते 60 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे खवय्ये निराश झाले आहेत.

खेकडे अभ्यासक व विक्रेते सर्वेश तरे यांनी सांगितले की, समुद्रात व खाडीत मिळणाऱ्या काळ्या पाटीच्या चिंबोऱ्यांचा हंगाम हा हिवाळा आणि उन्हाळा असतो. पावसाळ्यात या चिंबोऱ्या कमी मिळतात. कारण हा त्यांच्या प्रजननाचा मुख्य काळ असतो. 80 ते 100 रुपयाला एक आकाराने मोठा मध्यम नग मिळणारी ही चिंबोरी गाबोळीची 200 ते 300 रुपये नगाने मिळते आणि तिला मागणी जास्त असते. मात्र, हंगाम सरल्याने व आवक कमी झाल्याने किमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत; मात्र तरीही मोठा हंगाम गेल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सध्या खाऱ्या पाण्यातील चिंबोऱ्यांची आवक कमी आहे. कोरोनाचे संकट त्यात आलेले लॉकडाऊन यामुळे चिंबोऱ्या कमी प्रमाणात बाजारात उपलब्ध होत आहेत. अशा वेळी आवक कमी असल्याने चिंबोऱ्यांच्या किमती वधारल्या आहेत. सध्या 200 रुपयांना 4 अतिशय मध्यम आकाराच्या चिंबोऱ्या मिळत आहेत. एखाद-दुसरी छोटी चिंबोरी वर दिली जाते. मागील वर्षी या हंगामात 200 रुपयांत तब्बल 8 ते 10 मध्यम आकाराच्या चिंबोऱ्या मिळत होत्या. मात्र, आता खवय्यांना अधिकचे पैसे देऊन चिंबोऱ्या खरेदी कराव्या लागत आहेत. वाढलेल्या किमती आणि गेलेला हंगाम यामुळे खवय्ये निराश आहेत.

खाऱ्या पाण्यातील चिंबोऱ्या खूप आवडतात. मात्र, लॉकडाऊनमुळे यंदा त्या खायला मिळाल्या नाहीत. सध्या त्यांच्या किमती वाढल्या आहेत. चिंबोऱ्या आता फार कमी मिळतात. कुठे मिळाली तर 250 ते 300 रुपये गाबोळीची तिला ’इटची चिंबोरी’आणि पेण अलिबाग बाजूला ‘लाखची चिंबोरी’म्हणतात.
- नचिकेत घरत, खवय्ये, मांडवा-अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : सेवागिरी यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार; शाहिद मुलानींच्या बैलजोडीने जिंकला 'पुसेगाव हिंदकेसरी' किताब, तब्बल 1100 बैलगाड्यांचा सहभाग

Cameron Green: काल आयपीएल लिलावात २५.२० कोटी मिळाले अन् आज पठ्ठ्या भोपळ्यावर बाद झाला... KKR ला फसल्यासारखं झालं...

Viral Video: 'सर, हेल्मेट है, फिट नही आता', वृद्ध दुचाकीस्वाराचं उत्तर ऐकून सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

Kolhapur Forest Incident : बंदुका, सर्च लाईट, दोरी; शिकारींचा जंगलात रात्रीस खेळ चाले, वन विभागाने थरारकरित्या पाठलाग केला अन्

Latest Marathi News Live Update : लातुरात काँग्रेसच्या माजी महापौर आणि माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश

SCROLL FOR NEXT