चीनसोबत तणावाचा शेअर बाजारावर परिणाम; दोन टक्‍क्‍यांनी घसरण  
मुंबई

चीनसोबत तणावाचा शेअर बाजारावर परिणाम; झालीये इतकी घसरण!

कृष्ण जोशी

मुंबई : लडाख सीमेवर चीनबरोबर नव्याने निर्माण झालेला तणाव आणि मार्जिनसंदर्भातील नव्या नियमांमुळे आज शेअर बाजारात घबराट पसरली. गुंतवणूकदारांनी तुफानी विक्री केल्याने शेअर बाजार दोन टक्‍क्‍यांहूनही जास्त घसरला. मुंबई शेअर बाजार 839 अंशांनी घसरून 38,628 अंशांवर; तर राष्ट्रीय शेअर बाजार 260 अंशांनी घसरून 11,387 अंशांवर बंद झाला. 

आजच्या मोठ्या घसरणीमुळे शेअर बाजारांमधील सहा दिवसांच्या तेजीमध्ये आज खंड पडला. आज सकाळी बाजार सुरू झाल्यावर मुंबई शेअर बाजार सुमारे पाचशे अंश वर गेला; पण चाळीस हजार अंशांना स्पर्श केल्यावर तेथून मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू झाली. त्यातून निर्देशांक दिवसभरात सावरलेच नाही. सेन्सेक्‍सने 39 हजारांची, तर निफ्टीने 11 हजार 400 ची पातळीही खालच्या दिशेने तोडली. हा महिनाभर खरेदी करणाऱ्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आज तीन हजार 395 कोटी रुपयांचे समभाग विकले. देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 680 कोटी रुपयांची खरेदी केली. 

मुंबई शेअर बाजार निर्देशांकाचे मूल्य ठरविणाऱ्या प्रमुख तीस कंपन्यांपैकी आज फक्त ओएनजीसी, टीसीएस, एचडीएफसी बॅंक यांचे समभाग किरकोळ वाढ घेत बंद झाले. अन्य 27 समभागांच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली. सर्वांत जास्त घसरण सन फार्मामध्ये (6.71 टक्के) झाली. 37 रुपयांची घट दाखवून तो 518 रुपयांवर बंद झाला. बजाज फिनसर्व्ह 356 रुपयांनी पडून 6,187 रुपयांवर, तर बजाज फायनान्स 182 रुपयांनी घसरून 3489 रुपयांवर बंद झाला. कोटक बॅंक 65 रुपयांनी (बंद भाव 1402 रु.) व इंडस्‌इंड बॅंक 26 रुपयांनी (630 रु.) घसरला. लार्सन अँड टुब्रो (945 रु.), मारुती (6,837), आयसीआयसीआय बॅंक (395) व टाटास्टील (413) यांचेही भाव घसरले. 
---------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: LPG सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त! पेट्रोल, डिझेल आणि CNG चेही नवे दर जाहीर

Maharashtra Loan Waiver: अद्याप २०१७ ची कर्जमाफी प्रलंबित, ६ लाख ६४ हजार शेतकरी ९ वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत

Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा अपघात, तरुण गंभीर; डोक्यावर शस्त्रक्रिया

Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT