BJP Chitra Wagh esakal
मुंबई

Chitra Wagh on Urfi Jawed: आधी कपडे तर घाला मग बघू कोणी काय...; चित्रा वाघांचा उर्फीवर निशाणा

या राज्यात सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीनं नंगानाच चालू आहे ही आपली संस्कृती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : या राज्यात सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीनं नंगानाच चालू आहे ही आपली संस्कृती आहे का? त्या उर्फीला समर्थन करणाऱ्या सर्वांनी याचं उत्तर द्यावं. प्रत्येकाच्या घरात लेकीबाळी आहेत त्यांनी काय आदर्श ठेवायचा हिच्याकडून, असा सवाल करत आधी कपडे तर घाला मग बघू कोणी काय घालायचं अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर निशाणा साधला आहे. (Chitra Wagh on Urfi Jawed Wear clothes first then let see what we can wears)

वाघ म्हणाल्या, "एक महिला सतत मला मेसेज करत होती. मला बोलायचं आहे, मी तिला लिहून पाठवायला सांगितलं. त्यानंतर एका रात्री तीनं मला एक व्हिडिओ पाठवला आणि म्हणाली यावर काहीतरी करा. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी हालले. या व्हिडिओत एक महिला अंगावर नगण्य कपडे घालून भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरिराचं ओंगळवाणं, किळसवाणं प्रदर्शन करत फिरताना दिसली. या महिलेनं मला आणखी काही इन्स्टाग्रामच्या लिंक्स पाठवल्या त्या तर मी पाहूच शकले नाही. या महिलेनं मला सांगितलं की, दीड वर्षापूर्वी माझी ९ वर्षाची मुलगी अत्यंत घाणेरड्या विकृतीला बळी पडलेली आहे. चित्रा ताई या विषयांवर कोणी बोलणार आहे की नाही. म्हणून ही कोण उर्फी आहे आणि हीचा काय नंगा नाच आहे हे मी त्या दिवशी बघितलं. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही हा नंगानाच चालू देणार नाही"

"इथं विषय धर्माचा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जिथं महिलांचा मान राखला जातो त्या महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी हा जो नंगा नाचच्या विकृतीला आहे. विरोध त्या महिलेला उर्फीला नाही तिच्या नंगाच्या विकृतीला आहे. आमचा हा विरोध चालूच राहणार आहे आणि आम्ही तो पूर्णत्वाला नेणार आहोत. कोण म्हणतंय कोणी काय कपडे घालावेत आणि कोणी काही घालू नये. यावर काय बोलायचं पण आधी कपडे तर घाला मग बघू कोणी काय घालायचं आणि कोणी काय घालायचं नाही ते" असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

पण यामध्ये सर्वात मोठा मुद्दा आहे की जिथं समाजस्वास्थ गरजेचं असतं तिथं राजकारण करणं गरजेचं नसतं. पण दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रात हे झालं नाही. या राज्यात सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीनं नंगानाच सुरु आहे ही आपली संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे याचं उत्तर उर्फीला समर्थन करणार्यांनी द्यावं. प्रत्येकाच्या घरात लेकीबाळी आहेत तुम्ही तिच्यासमोर काय आदर्श ठेवणार आहात? म्हणून हा नंगा नाच आम्ही चालू देणार नाही हे मी वारंवार सांगू इच्छिते, असंही वाघ यांनी ठामपणे सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT