मुंबई

Mumbai Traffic Updates : ट्रॅफिक जामने केला मुंबईकरांचा मूड ऑफ, मुंबईच्या वेशीवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

सुमित बागुल

मुंबईः आज ख्रिसमसचा दिवस. त्यात शुक्रवार आल्यानं सलग तीन दिवस सुट्टीचे आलेत. त्यामुळे मुंबईच्या वेशींवर आज वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. आज सकाळपासून मुंबईच्या वेशीवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. शहरातल्या टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. 

मुंबई पुणे जामच जाम 

सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे नागरिक आपल्या कार्स घेऊन मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडलेत. लोणावळा, खंडाळा आणि पुण्याच्या दिशेने नागरिक निघाल्यामुळे मुंबईचा एक्झिट पॉईंट खालापूर या भागात पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीये. वाहतूक कोंडीमुळे पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांची काहीशी निराशा झालीये. 

मुंबई नाशिक हायवेवर वाहतूक कोंडी

सलग तीन दिवस सुटी आल्याने मुबंई नाशिक महामार्गावर गाड्यांच्या रंगा लागल्या आहेत. त्यातच मुबंईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या कसारा घाटात वाहातूक कोंडी झाली आहे. एकामागे एक अनेक छोट्या मोठ्या गाड्यांच्या रांगा लागल्याने मुबंई नाशिक महामार्गावर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. 

मुंबई गोवा हायवे जाम

मुंबई गोवा हायवेवर वडखळ बायपास मार्ग ते पोयनाडपर्यंत वाहतुक कोंडी आहे. तर अलिबागकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल 3किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्यात. पेणच्या पुढे वडखळला जाणाऱ्या बायपास मार्गाच्या पुलावर तसेच अलिबाग एक्झिटवर प्रचंड प्रमाणात वाहतुक कोडी पाहायला मिळतेय. ख्रिसमस आणि लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक शहराबाहेर पडतायत. मात्र एक ते दोन तासांच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक चांगलेच कावलेत.

ठाण्याच्या वेशीवर अभुतपूर्व ट्रॅफिक जाम 

मुंबईतल्या वाशी, ऐरोली, मुलुंड, दहिसर टोल नाक्यांवर जशा वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या. तशाच मोठ्या रांगा ठाणे जिल्ह्यातील कल्याण शिळफाटा तर भिवंडी मार्गावर देखील पाहायला मिळाल्यात. नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांमुळे या ठाणे आणि कल्याणमध्ये वाहतूक कोंडी झाली. जवळपास २ किलोमीटरपर्यत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कल्याण ते शिळफाटा या ३० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी दोन तास लागत आहेत. 

फास्ट टॅग प्रणालीमुळे ट्राफिक जाम 
 
देशभरातील टोल नाक्यांवर वेळ वाचविण्यासाठी फास्टॅग प्रणाली वर्षभरापूर्वीपासून बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, एकाचवेळी एवढे फास्टॅग मिळविणे आणि त्या प्रणालीतील दोष पाहून सरकारने ही मुदत काहीवेळा वाढविली होती. आता १ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. आज मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडलेत. मात्र सर्वांकडे अजूनही फास्ट टॅग नसल्याने वाशी टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झालीये.

Christmas Mumbai traffic alert slow moving toll plaza

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Satara Highway : पुणे-सातारा मार्गावर ट्रक उलटला, खंडाळा ते केसर्डीपर्यंत वाहनांच्या रांगा

T20 WC : फायनल सोडा, पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचणे अवघड झाले; न्यूझीलंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने गणित बिघडले

Holi 2026 Puranpoli Recipe: डायबेटीजमुळे होळीला मिस करताय पुरणपोळी? साखर आणि मैद्याशिवायची स्वादिष्ट रेसिपी नोट करा

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

Latest Marathi News Live Update : गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस

SCROLL FOR NEXT