मुंबई

पुणे नाही मुंबईकरांना सर्वात आधी अनुभवायला मिळणार आपलं आयुष्य बदलून टाकणारं तंत्रज्ञान...

सुमित बागुल

मुंबई : नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच AGM पार पडली. प्रत्येक AGM मध्ये रिलायन्स कोणत्यानाकोणत्या मोठ्या प्रोजेक्टची कायम घोषणा करत असते. यंदाही रिलायन्सने अशीच एक मोठी घोषणा केलीये.

यंदा रिलायन्सने भारतीयांना तुफान वेगाचं इंटरनेट आणि आपलं आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असणारं '5G' तंत्रज्ञानाचं स्वप्न दाखवलंय. येत्या काळात भारतीयांच्याही हातातही 5G कनेक्शन असणारे ऍडव्हान्स फोन असतील आणि ज्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल असं बोललं जातंय. मात्र हे स्वप्न खरं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तांत्रिक चाचण्यांची आवशकता आहे. ज्यासाठी रिलायन्सकडून सरकारकडे यासाठीचे स्पेक्ट्रम देखील मागितले गेलेत. स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यास रिलायन्सकडून 5G ची टेस्टिंग सुरु होणार आहे.

स्पेक्ट्रम म्हणजे काय ?

टेलिकॉम क्षेत्रात कुठल्याही प्रकारचा संवाद साधायचा असेल तर काही विशिष्ट लहरींचा वापर केला जातो. या लहरींच्या साहाय्यानेच, म्हणजेच या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजच्या साहाय्याने, वेगवेगळ्या उपकरणाच्या माध्यमातून संवाद साधला जातो. याचं सोपं उदाहरण म्हणजे रेडिओ. रेडिओवरील AM किंवा FM या विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर आपण रेडिओचे कार्यक्रम ऐकू शकतो. याच लहरींना तांत्रिक भाषेत 'स्पेक्ट्रम' असं म्हणतात. सरकारकडून या स्पेक्ट्रमचा लिलाव केला जातो. भारतातही पुढील वर्षी अद्ययावत अशा टेलिकम्युनिकेशनसाठीच्या 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार असल्याचं बोललं जातंय.   

रिलायन्स जिओ कंपनीकडून 5G टेस्टिंगसाठी 17 जुलैरोजी फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमची मागणी केलीये. यामध्ये कंपनीने 24 गिगाहर्ट्ज (GHz ) बँडमध्ये 800  मेगाहर्ट्ज  (MHz)  तर 3.5 गिगाहर्ट्ज (GHz ) बँडमध्ये 100 मेगाहर्ट्ज (MHz) स्पेक्ट्रम ची मागणी केलीये.

मुंबईकर ठरणार प्रथम लाभार्थी 

रिलायन्स जिओ कंपनीकडून खरंतर आधीपासूनच 5G तंत्रज्ञानावर काम सुरु आहे. ज्या प्रगत देशांमध्ये सध्या 5G वापरलं जातंय अशा ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, जपान या देशांमध्ये हाय फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्यालाही यामध्ये ट्रायल्स आणि टेस्टिंग्स कराव्या लागतील असं कंपनीचं म्हणणं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि दिल्लीत याचं सर्वात आधी टेस्टिंग होणार असल्याने मुंबईकर आणि दिल्लीकर सर्वात आधी 5G चे लाभार्थी ठरणार आहेत. 

citizens of mumbai will get first hand user experience of 5G technology

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT