मुंबई

सुरक्षित अंतरासाठी नागरिकांची खासगी वाहनाला पसंती! टू व्हिलर विक्रीला वेग येण्याची आशा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना महामारी आणि त्यामुळे आर्थिक संकट आले आहे, पण त्यानंतरही टू व्हिलरची विक्री येत्या काही महिन्यात वाढेल असा अंदाज व्यक्त होत आहे. सुरक्षित अंतर राखण्यासाठी अनेक जण सार्वजनिक वाहनांऐवजी खाजगी वाहनास पसंती देण्याचा विचार करीत आहे, त्यामुळे प्रसंगी सायकलच्याही विक्रीस चालना मिळेल असे मानले जात आहे.

कोरोनाचे आक्रमण रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. अनेक जण आपले दैनंदिन जीवन भविष्यात सुरु करण्याबाबत विचार करीत आहेत. त्यातूनच बस, लोकल या गर्दीच्या वाहनातून प्रवास करण्याऐवजी टू व्हिलरवरुन प्रवासाचा जास्त विचार होत आहे. शहर वाहतूकीच्या अभ्यासकही यास दुजोरा देत आहेत.

ऑटोमोबाईल सेक्टर अभ्यासकांचेही हेच मत आहे. त्यांच्या मते आर्थिक परिस्थिती माफक सुधारली तर टू व्हीलरच्या मार्केटमध्ये तेजी येईल असा अंदाज होत आहे. टू व्हिलरबरोबर सायकल तसेच कारच्या विक्रीसही चालना मिळेल असे काहींचे मत आहे. यापूर्वी खाजगी वाहने आरक्षित करुन प्रवास करणारेही आपल्या वाहनास पसंती देण्याची दाट शक्यता आहे. 

लॉकडाऊन कालावधीत वैयक्तिक वाहनांच्या प्रवासास पसंती मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत. श्रमिक स्पेशल तसेच खास ट्रेन सुरु झाल्यानंतरही काहींनी टू व्हिलरने प्रवास केला होता. एवढेच नव्हे तर अनलॉकनंतरही अनेकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेऐवजी वैयक्तिक वाहनास पसंती दिली याकडे लक्ष वेधले जात आहे. 

एवढेच नव्हे तर एका अहवालानुसार टू व्हिलरच्या उत्पादकांनी वाढत्या मागणीस सामोरे जाण्याची तयारी केली आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या शोरुममध्ये मोठ्या प्रमाणावर विचारणा होत असल्याचे सांगितले. जूनमध्ये नियमीत विक्रीच्या 80 टक्के विक्रीचे उद्दीष्ट जूनमध्ये गाठले जाईल असा अंदाज काही कंपन्यांचे आधिकारी व्यक्त करीत आहेत. जास्त मागणी ग्रामीण तसेच निम शहरी भागात असेल. या भागातून मुख्य शहरात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर जास्त विसंबून रहावे लागते याकडेही काही जण लक्ष वेधतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT