मुंबई

मुंबईकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अखेर नागरिकांना देणार 'या' बहुचर्चित औषधाचा डोस

सकाळवृत्तसेवा

मुंबई - वरळी आणि धारावी परीसरातील नागरीकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महापालिका हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देणार आहे. १८ ते ५५ वयोगटातील निरोगी नागरीकांना  हा डोस देण्यात येणार आहे.

धारावीतील ५० हजार आणि वरळीतील ५० हजार नागरीकांपैकी कोणताही आजार नसलेल्या व्यक्तींना या गोळ्या उद्यापासून देण्यास सुरवात होणार आहे. सात आठवडे हे औषध देण्यात येणार आहे. 'पहिल्या आठवड्यात प्रत्येकी २ गोळ्याा आणि पुढील प्रत्येक आठवड्यात प्रत्येकी १ गोळी देण्यात येणार आहे. लवकरत याची सुरवात करण्यात येणार आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मलेरीयाच्या रुग्णांना ही औषधे दिली जातात'. पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी याबाबत माहिती दिलीये.

धारावीत आता पर्यंत कोरोनाचे ५५ रुग्ण आढळले आहेत. तर, वरळी प्रभादेवी परीसरात २७० रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे पालिकेने या भागातील नागरीकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यस्थानमधिल जयपुर मधिल कोरोनाग्रस्त रुगणांच्या उपचारासाठी या औषधांचा वापर झाला होता. त्यानंतर अमेरिकेनेही ही औषधं भारताकडून मागवून घेतली आहेत.

आरोग्य सेविकांचं रॅपिड टेस्टिंग 

याची सुरवात या आठवड्याभरात होणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात आरोग्य सेविकांची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य सेविका सध्या शहरभरात फिरुन तापाचे रुग्ण शोधण्याबरोबरच जनजागृती करत आहेत. 

citizens of worli and dharavi area will get dose of hydroxychloroquine tablets

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT