Shivsena Vs BJP Esakal
मुंबई

Shivsena Vs BJP: श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजप-सेनेच्या समर्थकांमध्ये पुन्हा राडा; भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

अंकिता खाणे (Ankita Khane)

कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गटात) सर्व काही अलबेल सुरू नसल्याचं आज पुन्हा एकदा समोर आलं आहे. कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात भाजपचे चिन्ह भिंतीवर रंगवत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या समर्थकांनी विरोध दर्शवत बेदम मारहाण केल्याची घटना घडली समोर आली आहे. या घटनेनंतर भाजपने देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी आपल्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिंदे गटाला दिला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एकीकडे भाजप- शिवसेना एकत्र काम करत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आमचं डबल इंजिन सरकार आहे. आम्ही जोमाने काम करतो असं सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र मतदार संघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी सुरू असल्याचं समोर आलं आहे.

कल्याण चक्की नाका टेकडी परिसरात भाजपा कार्यकर्त्यांकडून भिंतींवर भाजपच्या पक्ष चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. या दरम्यान शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक त्या ठिकाणी आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध केला आणि तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्याना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे. यावेळी भाजप कल्याण शहराध्यक्ष संजय मोरे यांनी तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला आहे. भाजप शहर अध्यक्षासह कार्यकर्ते कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT