लवकरच '...या' कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरे!  
मुंबई

लवकरच '...या' कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरे!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : रस्ते, गटारे आणि महापालिका कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना लवकरच हक्काची घरे मिळणार आहेत. राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी पालिका मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी पालिकेतर्फे सफाई कामगारांना दिल्या जात असलेल्या सेवा-सुविधांबाबत आढावा घेतला. यादरम्यान सारवान यांनी काही प्रश्‍नही पालिका प्रशासनाला विचारले. त्या प्रश्‍नांना लेखी उत्तरे देताना पालिका कामगारांच्या घरांसाठी सिडको प्रशासनाकडे मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले. 

राज्यातील कामगारांच्या मागण्या आणि प्रश्‍न सोडवण्यासाठी राज्य सरकारतर्फे सफाई कर्मचारी आयोग कामकाज करते. आयोगातर्फे राज्यभरातील पालिकांचा आढावा घेऊन लेखा-जोखा मांडला जात आहे. शुक्रवारी (ता.7) हा लेखाजोखा जाणून घेण्यासाठी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यादरम्यान सारवान यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन मते जाणून घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना व सेवानिवृत्त कामगारांना किती घरे बांधून देण्यात आली आहेत, असा प्रश्‍न आयोगाने उपस्थित केला. याबाबत पालिकेने आयोगाला माहिती देताना घरे बांधण्यासाठी पालिकेच्या मालिकीची जमीन नसल्याने गृहप्रकल्प राबवला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, घरे बांधण्यासाठी सिडकोकडून भूखंड प्राप्त करण्यासाठी पत्रव्यवहार केला असून, भूखंड मिळाल्यावर घरे उभारण्यात येतील, अशी माहिती आयोगाला दिली. पालिकेने घराबाबत उचललेल्या पावलामुळे भविष्यात सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्‍न सुटणार आहे. 

महापालिका आस्थापनेवरील एकूण सफाई कर्मचाऱ्यांची संख्या किती, नियमानुसार त्यांना कोणत्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत, सफाई कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 1 तारखेला वेतन दिले जाते की नाही, हंगामी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन व इतर सुविधा देण्यात येतात का?, लाड समितीची शिफारक कधीपासून लागू करण्यात आली, सफाई कर्मचाऱ्यांची एकूण पदांपैकी रिक्त पदे किती? त्यांना धुलाई व गणवेश भत्ते दिले जातात की नाही, आदी प्रश्‍न आयोगाने पालिकेला उपस्थित केले. 

राज्य सफाई कर्मचारी आयोगाने सफाई कामगारांच्या सेवा-सुविधांबाबत उपस्थित केलेल्या सर्व प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरे दिली आहेत. पालिका सफाई कामगारांबाबत घेत असलेल्या धोरणांबाबत आम्ही समाधानी आहोत. भविष्यात कामगारांसाठी घरे उभारण्यासाठी आयोगातर्फे पालिकेकडे पाठपुरावा केला जाणार आहे. 
- मुकेश सारवान, अध्यक्ष, राज्य सफाई कर्मचारी आयोग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल,आधुनिक स्वयंचलित तराफ्याद्वारे होणार विसर्जन

एक वर्ष झालं आजारी, गोष्टी हातातून निसटण्याआधी थांबायला हवं; जाकिर खानने केली मोठ्या ब्रेकची घोषणा

Panchang 7 September 2025: आजच्या दिवशी ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

Latest Maharashtra News Updates : गणपतीला कोकणात गेलेले परतीच्या मार्गावर, रेल्वे स्टेशनवर तुडुंब गर्दी

Chh. Sambhajinagar: गणेश विसर्जनावेळी जीवघेणा प्रसंग; गणेश भक्ताला जीवनरक्षक दलाने दिले वेळेवर जीवनदान

SCROLL FOR NEXT